'तिला कब्रस्तानात जागा मिळणार नाही', उर्फी जावेदविरोधात अभिनेत्याने काढला फतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 15:40 IST2023-02-15T15:39:57+5:302023-02-15T15:40:59+5:30

उर्फीच्या विचित्र कपडे परिधान करणाऱ्यावर आक्षेप घेत हा मुस्लिम समुदायाचा अपमान असल्याचं त्याने म्हणलं आहे. 

faizal ansari deny land for urfi javed for her burial says she is defaming muslim community | 'तिला कब्रस्तानात जागा मिळणार नाही', उर्फी जावेदविरोधात अभिनेत्याने काढला फतवा

'तिला कब्रस्तानात जागा मिळणार नाही', उर्फी जावेदविरोधात अभिनेत्याने काढला फतवा

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदवर (Urfi Javed) टीका सुरुच आहे. आता उर्फीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीने (Faizan Ansari) उर्फी जावेद विरोधात फतवाच काढला आहे. उर्फीच्या विचित्र कपडे परिधान करणाऱ्यावर आक्षेप घेत हा मुस्लिम समुदायाचा अपमान असल्याचंही त्याने म्हणलं आहे. 

कब्रस्तानमध्ये जागा मिळणार नाही 

उर्फी जावेद विरोधात फतवा काढताना फैजान अन्सारीने दिल्लीचे मौलाना आणि मुंबई शहराचे काजी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. फैजानने म्हणाला, 'उर्फी जावेद ज्या पद्धतीने कपडे घालते यामुळे मु्स्लिम समुदायाची बदनामी होत आहे. इस्लामला मानत नाही असं जर ती म्हणत असेल तर आधी तिने तिचे नाव बदलावे. जेव्हा एखादी मुस्लिम मुलगी अशा प्रकारे कपडे घालते तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटते.'

फैजान पुढे म्हणाला, 'उर्फीने इस्लामचा अपमान केला आहे. जेव्हा तिचा मृत्यू होईल तेव्हा तिला कब्रस्तानात जागा मिळणार नाही. '

उर्फी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. शिवाय ती कुठेही बाहेर आली की पापाराझी तिच्या मागे असतात.तिच्या बोल्ड लुकमुळे ती कायम सध्या चर्चेचा विषयच बनली आहे. शिवाय तिला प्रचंड ट्रोलिंग आणि टीकाटिप्पणीला सामोरे जावे लागत आहे. 

Web Title: faizal ansari deny land for urfi javed for her burial says she is defaming muslim community