रमजानच्या पवित्र महिन्यात फैजल शेखनं केला उमराह, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:46 IST2025-03-20T18:45:57+5:302025-03-20T18:46:09+5:30

दरवर्षी लाखो भक्त मक्केला उमराह करण्यासाठी जातात. 

Faisal Shaikh Aka Mr Faisu Performing Umrah In Makkah during the holy month of Ramadan | रमजानच्या पवित्र महिन्यात फैजल शेखनं केला उमराह, शेअर केले फोटो

रमजानच्या पवित्र महिन्यात फैजल शेखनं केला उमराह, शेअर केले फोटो

Faisal Shaikh Aka Mr Faisu Performing Umrah: मिस्टर फैझू म्हणून ओळखला जाणारा सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर फैजल शेख (Faisal Sheikh) याला सध्या कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने कमी वयातच स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. आता त्याने उमराहचे फोटो शेअर करुन गोड बातमी दिली.  फैजल शेखनं रमजानच्या पवित्र महिन्यात उमराह पुर्ण केला आहे. मुस्लिम धर्मात उमराहला (Umrah) विशेष मानले जाते. दरवर्षी लाखो भक्त मक्केला उमराह करण्यासाठी जातात. 

फैजल शेखनं सोशल मीडियावर उमराहचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत त्याच्या चेहऱ्यावर शांतता आणि आनंद पाहायला मिळाला. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, 'मला नेहमीच लक्षात राहील असा एक क्षण. पवित्र मक्कामध्ये पावसात उमराह केला. पावसाचा प्रत्येक थेंब आशिर्वादासारखा वाटत होता, चिंता धुवून टाकणारा होता आणि माझे हृदय कृतज्ञतेने भरलं. काबासमोर पावसात उभा होतो, डोळ्यात अश्रू होते, यावेळी मला देवाच्या दयेचं सौंदर्य आणि या प्रवासाची पावित्र्य जाणवलं. आपल्या सर्वांना या पवित्र प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी मिळो".



 
फैजूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो अलिकडेच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या शोमध्ये दिसला होता. या शोमध्ये त्यानं आपलं कुकिंगचं कौशल्य दाखवलं होतं. या शोमध्ये त्याच्यासोबत तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कर सारखे स्टार्स दिसले. या शोची प्रशिक्षक फराह खानने फैजू आणि अभिनेत्री जन्नत झुबेरच्या लग्नाचे संकेत दिले होते. पण,  काही दिवसांपूर्वीचं दोघाचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे.  दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. जन्नतचा भाऊ आणि आईनेही फैजूला अनफॉलो केलं आहे. 

Web Title: Faisal Shaikh Aka Mr Faisu Performing Umrah In Makkah during the holy month of Ramadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.