​Exclusive : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेनची शाहरुख खानने घेतली काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 18:18 IST2017-08-01T09:08:02+5:302017-08-01T18:18:35+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी ही मालिकेत प्रेक्षकांना गेल्या काही दिवसांपासून खूपच कमी ...

Exclusive: Shah Rukh Khan took the care of Tarak Mehta's reverse glasses in the series | ​Exclusive : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेनची शाहरुख खानने घेतली काळजी

​Exclusive : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेनची शाहरुख खानने घेतली काळजी

रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी ही मालिकेत प्रेक्षकांना गेल्या काही दिवसांपासून खूपच कमी पाहायला मिळत आहे. दिशा गरोदर असल्याने ती मालिकेत खूपच कमी दिसत आहे. दिशा गरोदर असल्यामुळे ती मालिका सोडणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे तिने म्हटले आहे. दिशाला सातवा महिना असूनही ती चित्रीकरण करत आहे. नुकतेच शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांनी या मालिकेसाठी चित्रीकरण केले. शाहरुख आणि अनुष्का सध्या जब हॅरी मेट सेजल या त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी विविध कार्यक्रमात आणि मालिकांमध्ये हजेरी लावत आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर देखील गेले होते.
दिशा सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सगळ्याच भागांसाठी चित्रीकरण करत नाही. केवळ एखादा महत्त्वाचा भाग असल्यास ती मालिकेच्या सेटवर येते. शाहरुख आणि अनुष्का मालिकेच्या सेटवर येणार असल्याने दिशा देखील चित्रीकरणासाठी आली होती. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर याआधी देखील शाहरुख खान त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला आहे. त्यामुळे त्याचे या मालिकेतील सगळ्याच कलाकारांसोबत खूप चांगले संबंध आहेत. दिशा गरोदरपणातही चित्रीकरण करत असल्याने शाहरुख तिची मालिकेच्या सेटवर खूपच काळजी घेत होता. चित्रीकरणाच्या दरम्यान ती आराम करतेय का याकडे त्याचे लक्ष होते. एवढेच नव्हे तर त्याची खुर्ची देखील तो तिला बसण्यासाठी देत होते. 
शाहरुखसारखा सुपरस्टार आपली एवढी काळजी घेत आहे हे पाहून दिशाला देखील प्रचंड आनंद झाला होता. 

Also Read : दिशा वकानी म्हणजेच दया सोडणार नाही तारक मेहता का उल्टा चष्मा

Web Title: Exclusive: Shah Rukh Khan took the care of Tarak Mehta's reverse glasses in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.