Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा

By कोमल खांबे | Updated: September 20, 2024 17:00 IST2024-09-20T17:00:03+5:302024-09-20T17:00:31+5:30

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आर्याने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बिग बॉसच्या घरातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. याबरोबरच बिग बॉस हिंदीची ऑफर होती, असा गौप्यस्फोटही आर्याने केला. 

Exclusive bigg boss marathi fame aarya jadhav revealed that she had offered for bigg boss 16 and ott | Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा

Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या सीझनमध्ये घरातील नियम मोडण्यापासून ते हिंसक होण्यापर्यंत सदस्यांकडून सीमा पार झाल्या. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्कीच्या कानाखाली मारल्याने आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आर्याला खेळ अर्धवटच सोडून बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आर्याने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बिग बॉसच्या घरातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. याबरोबरच बिग बॉस हिंदीची ऑफर होती, असा गौप्यस्फोटही आर्याने केला. 

"बिग बॉस हिंदीमध्ये जायला आवडेल का?" असा प्रश्न आर्याला विचारण्यात आला होता. त्यावर तिने हो असं उत्तर देत याआधीही बिग बॉस हिंदीसाठी विचारणा झाल्याचा खुलासा केला. आर्याला बिग बॉस हिंदी आणि बिग बॉस ओटीटी दोन्हीसाठी विचारणा झाली होती. बिग बॉस हिंदी १६ ची आर्याला ऑफर होती. या सीझनमध्ये तिला वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी विचारण्यात आलं होतं. आर्या म्हणाली, "मला याआधी दोनदा हिंदी बिग बॉसची ऑफर होती. एमसी स्टॅनच्या सीझनसाठी मला वाइल्ड कार्डसाठी विचारण्यात आलं होतं". 


"एल्विश यादव विजेता असलेल्या बिग बॉस ओटीटी २ ची देखील मला ऑफर होतीा. पण, मला मराठी प्रेक्षकांसाठी बिग बॉस मराठीमध्ये यायचं होतं. म्हणून मी या दोन्ही ऑफर नाकारल्या", असंही आर्याने पुढे सांगितलं. "पुन्हा बिग बॉस मराठीमध्ये जायला आवडेल का?" या प्रश्नावर आर्याने हो असं उत्तर दिलं. आर्याने बिग बॉस मराठी टॉप ३ स्पर्धक सांगताना अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर यांची नावे घेतली. 

Web Title: Exclusive bigg boss marathi fame aarya jadhav revealed that she had offered for bigg boss 16 and ott