'लक्ष्मी निवास' मालिकेत उत्कंठावर्धक वळण, भावनाच्या गळ्यातील मंगळसुत्रामागचं गुपित उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 14:29 IST2025-04-29T14:28:57+5:302025-04-29T14:29:17+5:30

Lakshmi Niwas Serial : 'लक्ष्मी निवास' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

Exciting twist in the series 'Lakshmi Niwas', the secret behind the mangalsutra around Bhavana's neck will be revealed | 'लक्ष्मी निवास' मालिकेत उत्कंठावर्धक वळण, भावनाच्या गळ्यातील मंगळसुत्रामागचं गुपित उलगडणार

'लक्ष्मी निवास' मालिकेत उत्कंठावर्धक वळण, भावनाच्या गळ्यातील मंगळसुत्रामागचं गुपित उलगडणार

'लक्ष्मी निवास' (Lakshmi Niwas Serial ) मालिकेला सुरूवातीपासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील लक्ष्मी आणि श्रीनिवासने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. दरम्यान आता मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत देवीचा उत्सव साजरा होतो आहे. दळवी, गाडे पाटील आणि इतर कुटुंब या उत्सवात सहभागी झाली आहेत. उत्सवादरम्यान विश्वा-जान्हवी, विश्वा-जयंत आणि सई-जान्हवी यांच्यातील संवादातून अनेक गोष्टी समोर येणार आहेत.

एकीकडे हे सगळं घडत असताना वेंकी आणि आरतीमध्ये प्रेमाचं नातं बहरताना दिसत आहे. सिद्धूला भावना विषयीच्या त्याच्या भावना सतावत आहेत आणि म्हणून तो देवीसमोर आपली खरी ओळख उघड करण्याचा निर्णय घेतो. तो जशी ह्याबद्दल कबुली देणार इतक्यात देवीच्या मूर्तीवरील मंगळसूत्र खाली पडत आणि सिद्धू ते अलगद पकडतो आणि त्याच क्षणी ठरवतो की काहीही झालं तरी तो हे मंगळसूत्र भावनाच्या गळ्यात घालेल. 


प्रसाद वितरणाच्या वेळी लक्ष्मीचा भाऊ दिग्विजय लक्ष्मीला प्रसाद द्यायला नकार देतो. तो तिचा आणि श्रीनिवासचा अपमान करून तो रिक्षा चालक आहे हे बोलून दाखवणार आहे. लक्ष्मी श्रीनिवासच्या मागे ठामपणे उभी राहत कोणतीही नोकरी लाजिरवाणी नसल्याचे स्पष्ट करत तिला आपल्या नवऱ्याचा अभिमान आहे असल्याचं ठामपणे सांगते. भावनाच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं गेलंय. कोणी घातलंय तिच्या गळ्यात हे मंगळसूत्र ? हा विचार तिला आतून अस्वस्थ करतोय. ती स्वतःला वचन देते की जोपर्यंत जबाबदार व्यक्ती पुढे येत नाही, तोपर्यंत ती मंगळसूत्र काढणार नाही. घरात सर्वांना जेव्हा भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याचं कळणार आहे तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसणार आहे. आता सिद्धू सर्वांसमोर येऊन सत्य उलगडेल ? भावनाला हे सत्य कळल्यावर तीचा काय निर्णय असेल ? असे अनेक खुलासे या महामुहुर्ताच्या निमित्ताने होणार आहेत. 

Web Title: Exciting twist in the series 'Lakshmi Niwas', the secret behind the mangalsutra around Bhavana's neck will be revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.