n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">मझाक मझाक या कार्यक्रमात क्रिकेटर हरभजन सिंग आणि शोएब अख्तर परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. पण हे दोन परीक्षक आपली परीक्षकांची खुर्ची सोडून आता स्पर्धक बनणार आहेत. त्यांच्या ऐवजी या कार्यक्रमातील स्पर्धक राजू श्रीवास्तव आणि गोशी खान परीक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहेत. हरभजन पहिल्यांदाच रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होत असल्याने त्याच्यासाठी हा सगळा अनुभव खूपच नवीन आहे. लोकांना हसवणे हे किती कठीण असते हे या कार्यक्रमामुळे मला कळले असल्याचे तो सांगतो. हरभजन आणि शोएबने स्पर्धक म्हणून खूपच चांगला परफॉर्मन्स दिला. हा पाहून सगळ्यांनी उभे राहून त्यांना दाद दिली.
Web Title: The examiner plays the competitor
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.