n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">कवच... काली शक्तियो से या मालिकेला खूपच कमी दिवसांत प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आता या मालिकेत मंजुलिकाची भूमिका साकारणाऱया महेक चहलला मालिकेतून काढण्यात आल्याचे कळतेय. काही दिवसांपूर्वी मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना एक छोटासा अपघात झाला होता आणि महेकला त्यात दुखापत झाली होती. तिच्या पायाला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण तरीही महेक या मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण मालिकेच्या चित्रीकरणाला ती खूपच कमी वेळ यायची. सेटवर आल्यानंतर प्रत्येक गोष्ट तिच्या मर्जीप्रमाणे व्हावी असे तिला वाटत असे. तिच्या या वागणुकीमुळे सगळेच कंटाळले होते. तिची तक्रार या मालिकेची निर्माती एकता कपूरपर्यंतही करण्यात आली होती. यामुळेच तिला मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळतेय. या मालिकेत तिची जागा सारा खान घेणार असल्याचेही कळतेय.