​हर मर्द का दर्द या मालिकेत अभिनेत्री नव्हे अभिनेता असणार प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 16:27 IST2017-01-23T10:57:54+5:302017-01-23T16:27:54+5:30

कोणत्याही स्त्रीला समजून घेणे हे कठीणच नव्हे तर अशक्य असते असे म्हटले जाते. स्त्रियांना नेमके हवे आहे तरी काय ...

Every man's pain or an actress in the lead role would be an actor | ​हर मर्द का दर्द या मालिकेत अभिनेत्री नव्हे अभिनेता असणार प्रमुख भूमिकेत

​हर मर्द का दर्द या मालिकेत अभिनेत्री नव्हे अभिनेता असणार प्रमुख भूमिकेत

णत्याही स्त्रीला समजून घेणे हे कठीणच नव्हे तर अशक्य असते असे म्हटले जाते. स्त्रियांना नेमके हवे आहे तरी काय हा प्रश्न सगळ्याच पुरुषांना पडतो. याच प्रश्नांभोवती गुंफलेली हर मर्द का दर्द ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेद्वारे एक वेगळा विषय छोट्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मालिकेचे दिग्दर्शन परमीत सेठी करत आहे. परमीतने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, दिलजले यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयानंतर परमीत काही वर्षांपूर्वी दिग्दर्शनाकडे वळला. त्याने बदमाश कंपनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हर मर्द का दर्द या मालिकेद्वारे तो आता छोट्या पडद्यावर दिग्दर्शन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेविषयी परमीत सांगतो, "माझ्या बायकोला समजून घेणे आणि तिला नक्की काय हवे आहे हे जाणून घेणे आता मी इतक्या वर्षांनंतर सोडूनच दिले आहे. त्यामुळे आता या मालिकेच्या निमित्ताने पुरुषांची समस्या मी सगळ्यांसमोर एका वेगळ्या ढंगात मांडणार आहे." 
सतिश कौशिक सांगतात, "ही मालिका सासू-सुनेच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी असल्याने प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या मालिकेत पुरुषांना काय काय सहन करावे लागते हे एक मनोरंजकरित्या मांडलेले आहे. छोट्या पडद्यावरच्या कोणत्याही मालिकेत अभिनेत्री हीच प्रमुख भूमिकेत असते. पहिल्यांदाच प्रेक्षकांना एक पुरुषांच्या आयुष्यावर आधारित मालिका पाहायला मिळणार आहे. पुुरुष आपल्या पत्नी आणि पालकांमध्ये कशाप्रकारे भरडला जातो आणि त्या परिस्थितीत आपले जीवन कशाप्रकारे जगतो हे या मालिकेतून दाखवले जाणार आहे." 


Web Title: Every man's pain or an actress in the lead role would be an actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.