इंडस्ट्रीतलाच आहे ईशा डे चा नवरा, समोर आलं नाव; प्रसिद्ध मालिकांसाठी केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:56 IST2026-03-11T16:55:34+5:302026-03-11T16:56:09+5:30
कोण आहे ईशा डेचा नवरा? ओळखलंत का?

इंडस्ट्रीतलाच आहे ईशा डे चा नवरा, समोर आलं नाव; प्रसिद्ध मालिकांसाठी केलंय काम
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डे आज लग्नबंधनात अडकली. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाआधीच्या फंक्शन्सचे फोटो व्हायरल होत होते. ईशाने नवऱ्याचं नाव कुठेही रिव्हील केलं नव्हतं. हास्यजत्रेतील कलाकार, छाया कदम अशा सेलिब्रिटींनी होणार्या नवरीसोबतचे फोटो पोस्ट केले होते. मात्र नवऱ्याचं नाव कुठेच नव्हतं. आज अखेर ईशाच्या नवऱ्याचं नाव कळलं असून तो इंडस्ट्रीतलाच असल्याचं समोर आलं आहे. कोण आहे तो?
ईशा डे च्या लग्नाला हास्यजत्रेतील मंडळी रवाना झाली. वनिता खरातने प्रियदर्शिनी आणि रोहित मानेसोबत एक फोटो स्टोरीवर शे्अर केला. 'मज्जा आली पाहिजे' असं तिने लिहिलं होतं. यासोबत तिने कोपऱ्यात ईशा डे आणि अभिषेक खणकरला टॅग केलं आहे. यावरुन अभिषेकचं म्हणजेच ईशाच्या नवऱ्याचं नाव रिव्हील झालं.

कोण आहे अभिषेक खणकर?
अभिषेक खणकर हा मराठी इंडस्ट्रीतलाच आहे. तो प्रसिद्ध गीतकार आहे. 'खुलता कळी खुलेना' मालिकेचं गीत त्यानेच लिहिलं होतं. शिवाय सध्याच्या 'लक्ष्मी निवास' मालिकेचंही गीत त्यानेच लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या सुबोध भावे आणि मानसी नाईकचा सिनेमा 'सकाळ तर होऊ द्या'साठी त्याने गीत लिहिले आहे. अनन्या सिनेमातील गाण्यासाठी तर त्याला राज्य मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

ईशा आणि अभिषेकचं लग्न पाचगणी येथे झालं. त्यांच्या लग्नात सचिन गोस्वामी, वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद देशपांडे, आकांक्षा गाडे असे अनेक कलाकार उपस्थित होते.