'ही' व्यक्ती ठरली विशाल सिंगची लकी चार्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 19:10 IST2018-10-16T19:00:43+5:302018-10-16T19:10:30+5:30

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत तेवरची भूमिका साकारणाऱ्या विशाल आदित्य सिंहला या पुरस्कार सोहळ्यात ‘आवडता गुणवान सदस्य’चा पुरस्कार देण्यात आला.

Erica Fernandes is Vishal Aditya Singh’s ‘Lucky Charm’ | 'ही' व्यक्ती ठरली विशाल सिंगची लकी चार्म

'ही' व्यक्ती ठरली विशाल सिंगची लकी चार्म

‘स्टार परिवार पुरस्कार 2018 सोहळा’ एक भव्य आणि दणदणीत स्वरूपात होण्यासाठी आयोजकांनी कोणतीही कसर शिल्लक ठेवली नव्हती. या भव्य सोहळ्यात ‘स्टार’ परिवारातील सर्व कलाकार एकत्र येऊन त्यांनी खूप आनंदात आणि धमालमस्तीत हा कार्यक्रम साजरा केला. या सोहळ्यात दोन कलाकारांमधील वाढत्या मैत्रीचे दर्शनही प्रेक्षकांना घडले. हे कलाकार म्हणजे विशाल आदित्य सिंह (तेवर) आणि प्रेरणा (एरिका फर्नांडिस). विशाल एरिकावर फिदा झाल्याचे सर्वांनाच दिसत होते कारण तो संपूर्ण सोहळाभर तिच्या मागे मागे फिरत होता आणि त्याने आपल्या पुरस्कार स्वीकृतीच्या भाषणातही तिचा उल्लेख केला.

कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत तेवरची भूमिका साकारणाऱ्या विशाल आदित्य सिंहला या पुरस्कार सोहळ्यात ‘आवडता गुणवान सदस्य’चा पुरस्कार देण्यात आला. आपल्या पुरस्कार स्वीकृतीच्या भाषणात विशालने एरिकाचे आभार मानले आणि ती आपला “लकी चार्म” बनली आहे, असे तो म्हणाला. या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना विशाल म्हणाला, “हा पुरस्कार मिळाल्यामुळे मी फारच भारावून गेलो आहे. प्रेक्षकांना या मालिकेतील माझी भूमिका आवडत असल्याचं पाहून मला खूप समाधान वाटतं आणि यापुढेही मी त्यांची अशीच करमणूक करण्याचा प्रयत्न करीन. आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. ती अशी की या पुरस्काराबद्दल मी एरिका फर्नांडिसचाही आभारी आहे. कारण ती माझ्या शेजारी बसली होती आणि त्यामुळे तिच्या सुदैवाचा काही अंश तिने मला देऊ केला, ज्यामुळेच मला हा पुरस्कार मिळू शकला. ती माझा लकी चार्म बनली आहे कारण तिच्या सान्निध्यामुळेच मला ‘स्टार परिवार पुरस्कारा’तील पहिला पुरस्कार मिळाला आहे. भविष्यात मला ज्या पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं असेल, त्या सर्व सोहळ्यातही ती माझ्याबरोबर राहावी, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.”

Web Title: Erica Fernandes is Vishal Aditya Singh’s ‘Lucky Charm’