​या कलाकाराची होणार बन मस्का या मालिकेत एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 17:02 IST2016-11-18T17:02:25+5:302016-11-18T17:02:25+5:30

सतरंगी रे, बावरे प्रेम हे, क्लासमेट, झेंडा यांसारख्या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सिद्धार्थ सध्या अनेक चित्रपटात ...

Entry in this series will be the artist of Masca | ​या कलाकाराची होणार बन मस्का या मालिकेत एंट्री

​या कलाकाराची होणार बन मस्का या मालिकेत एंट्री

रंगी रे, बावरे प्रेम हे, क्लासमेट, झेंडा यांसारख्या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सिद्धार्थ सध्या अनेक चित्रपटात झळकत असला तरी त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात ही छोट्या पडद्यापासून केली आहे. सिद्धार्थने अग्निहोत्र या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्याची ही पहिलीच मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेनंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. त्याचे चित्रपटातील करियर खूपच चांगले सुरू आहे. सध्या तो चित्रपटात व्यग्र असल्याने त्याला मालिकांमध्ये काम करता येत नाहीये. पण सिद्धार्थच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. तो लवकरच एका मालिकेत झळकणार आहे. 
बन मस्का या मालिकेत तो प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तो एक पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. तो या मालिकेत प्रेक्षकांना कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार नाहीये. तर तो सिद्धार्थ चांदेकर म्हणूनच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मैत्रयीची मैत्रीण ऐश्वर्या सिद्धार्थ चांदेकरची फॅन असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. ती सिद्धार्थच्या मागे पूर्णपणे वेडी आहे. त्यामुळे आता या मालिकेत सिद्धार्थची एंट्री लवकरच दाखवायची असे दिग्दर्शकांनी ठरवले आहे. सिद्धार्थलादेखील या मालिकेेविषयी आणि त्याच्या या भूमिकेविषयी सांगण्यात आले त्यावेळी त्याला ही गोष्ट प्रचंड आवडली. मालिकेत स्वतःचीच भूमिका साकारायची असल्याने त्याने मालिकेसाठी लगेचच होकार दिला. सिद्धार्थची एंट्री झाल्यानंतर मालिकेच्या कथानकाला एक वळणही मिळणार असल्याचे कळतेय. 
सिद्धार्थ या मालिकेत काम करण्यासाठी खूप उत्सुक असून लवकरच या मालिकेचे चित्रीकरण करणार असल्याचे म्हटले जात आहे. 



 

Web Title: Entry in this series will be the artist of Masca

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.