Bigg Boss 12 मध्ये येण्याआधी अनुप जलोटांची गर्लफ्रेंड जसलीन झळकली होती या एडल्ट सिनेमात,वडिलांच्याच सिनेमात दाखवल्या होत्या मादक अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 06:30 IST2018-09-22T15:51:04+5:302018-09-24T06:30:00+5:30
अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या या कथित रिलेशनशिपवर कुणाचाही विश्वास बसला नाही. सध्या सगळी याच जोडीची चर्चा आहे.

Bigg Boss 12 मध्ये येण्याआधी अनुप जलोटांची गर्लफ्रेंड जसलीन झळकली होती या एडल्ट सिनेमात,वडिलांच्याच सिनेमात दाखवल्या होत्या मादक अदा
बिग बॉस सीझन 12 ला दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रिअॅलिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत आला आहे. यातील सगळ्यात वादग्रस्त म्हणजे 65 वर्षीय भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांची 28 वर्षीय गर्लफ्रेंड जसलीन मथारु यांची जोडी. गेल्या 3 वर्षांपासून रिलेशिनशिपमध्ये असणारी ही जोडी बिग बॉसच्या स्टेजवर अवतरली त्यावेळी सलमान खानसह रसिकांनाही धक्का बसला.अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या या कथित रिलेशनशिपवर कुणाचाही विश्वास बसला नाही. सध्या सगळी याच जोडीची चर्चा आहे.
सोशल मीडियावरही अनुप जलोटा आणि जसलीन यांच्यावर मीम्स, शायरी आणि जोक्स बनत आहेत. अनुप आणि जसलीन यांच्या नात्याला जसलीनचे वडिल केसर मथारु यांनीही नाकारलं आहे. हे सगळे बनावट असल्याचा केसर मथारु यांचा दावा आहे. जसलीन एक गायिका असण्यासह अभिनेत्री असल्याचंही आता समोर आलं आहे. जसलीनचे वडिल केसर मथारु हे एक दिग्दर्शक आहे. त्यांनी बॉलीवुडचे सिनेमा नाही तर एडल्ट सिनेमा आणि पॉर्न सिनेमांचं दिग्दर्शन केले आहे.
2013 साली त्यांनी 'डर्टी रिलेशन' नावाचा एक सिनेमा बनवला होता. या सिनेमाची सुरुवातच जसलीनच्या एका बोल्ड आणि सेक्सी डान्सने होते. या गाण्यात जसलीन आपल्या मादक अदांसह सेक्सी बॉडीचं प्रदर्शन करते. 'डर्टी रिलेशन' या सिनेमातील ‘लव डे’ या गाण्यावर सेक्सी डान्स करत जसलीनने बिग बॉस-12च्या स्टेजवर एंट्री केली होती.
डर्टी रिलेशननंतर जसलीनच्या वडिलांनी 2016 साली 'डर्टी बॉस' नावाचा एडल्ट सिनेमा बनवला होता. यांतही जसलीनने हॉट सीन्स दिले होते. यांत जसलीनसोबत अभिनेता अनुपम खेर यांचे भाऊ अभिनेता राजू खेर झळकले होते. जसलीनच्या वडिलांसह तिचा भाऊ कवलजीत सिंह मथारु हासुद्धा एक अभिनेता आणि निर्माता आहे. तो आपल्या वडिलांच्या सिनेमाच्या कामात मदत करतो.