'आई तुळजाभवानी'मध्ये भावनिक वळण, आई तुळजाभवानीचे कवडीमध्ये वास्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 18:41 IST2025-05-17T18:41:21+5:302025-05-17T18:41:38+5:30
देवीच्या अलौकिक रूपबदलाचे दर्शन प्रेक्षकांना घेता येणार आहे.

'आई तुळजाभवानी'मध्ये भावनिक वळण, आई तुळजाभवानीचे कवडीमध्ये वास्तव्य
कलर्स मराठीवरील लोकप्रिय पौराणिक मालिका आई तुळजाभवानी दिवसेंदिवस अधिक गूढ, आध्यात्मिक आणि भावनिक वळण घेते आहे. येत्या आठवड्यात मालिकेत आई तुळजाभवानीने एक विलक्षण रूप घेतलं असून, ती कवडीच्या माध्यमातून भक्तांशी संवाद साधताना दिसते आहे. असुरांचे निर्दालन एका क्षणात करता येत असताना दैवी शक्तीची रचना अशी काय होती, ज्यामुळे देवांच्या अवतारांनाही असुरांचा शेवट करणे आव्हानात्मक ठरले. त्याची रुपकात्मक श्वास खिळवून ठेवणारी कथा मालिकेत उलगडते आहे.
देवी तिच्या ईश्वरी शक्तींचा वापर करत असुर महिषासुरासमोर प्रकट होते. मात्र, ही लढाई केवळ एका असुराशी नसून, असुरी वृत्तीशी आहे जी भक्तांमध्येही दडलेली असू शकते.हा देवीच्या मनात आदिशक्तीने रुजवलेला विचार या कथानकाला अनपेक्षित कलाटणी देतो. देवीचे वास्तव्य अचानक एका कवडीत दिसते, या कवडीची निर्मिती कशी झाली. आता नक्की पुढे काय होणार ? कवडी मध्ये देवीने वास्तव्य केल्यानंतर मालिकेत नक्की काय घडणार? असुरांचा नाश करण्यासाठी उचलेले हे पाऊल नक्की कुठे घेऊन जाणार आहे.
सत्याचा आणि धर्माचा विजय करण्यासाठी नव्या रूपात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. देवीचा कवडीतील निवास आणि तिचा स्वरूप बदल, प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव घेऊन आला आहे. हे रूप म्हणजे देवीच्या ‘सर्वव्यापी’ असण्याचं प्रतीक मानलं जाते आणि आजही दरवर्षी देवीची पालखी आमराईत दाखल होते. आई तुळजाभवानी मालिकेच्या व्हिएफएक्स साठी सीजी पाइपलाइन आणि अनरिअल इंजीनचा वापर केला जात आहे. हा टप्पा निर्मिती प्रक्रियेमध्ये एक नवे पर्व घडवणारा आहे. ग्राफिकल कवडी तयार करण्यासाठी मुळातच ३० ते ४८ तास लागले. प्रत्येक भागात कवडीसारख्या व्हिज्युअल एलिमेंटसाठी तब्बल १२ तासांची मेहनत घेतली जाते, कारण त्या कवडीत देवीचे रूप दिसणार आहे आणि ती कवडी फिरणारसुद्धा आहे. हे दृश्य केवळ तांत्रिकदृष्ट्या नाही, तर भावनिकदृष्ट्याही प्रेक्षकांना भारावून टाकणारे असेल. देवीच्या अलौकिक रूपबदलाचे दर्शन असेल.