'एक था राजा एक थी रानी' अनिता राजची मालिकेत रिएंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 17:17 IST2017-02-28T11:47:39+5:302017-02-28T17:17:39+5:30

'एक था राजा एक थी रानी'मध्ये सुंदर ईशा सिंग आणि  देखणा सरताज  गिल यांच्या प्रमुख भूमिका असून आता या ...

'Ek Tha Raja Ek Tha Rani' Anita Rajchi's series of reentry | 'एक था राजा एक थी रानी' अनिता राजची मालिकेत रिएंट्री

'एक था राजा एक थी रानी' अनिता राजची मालिकेत रिएंट्री

'
;एक था राजा एक थी रानी'मध्ये सुंदर ईशा सिंग आणि  देखणा सरताज  गिल यांच्या प्रमुख भूमिका असून आता या मालिकेत भरपूर  रंजक घडमोडी पाहायला मिळणार आहेत.यासह बॉलिवूड अभिनेत्री अनिता राज या मालिकेत कमबॅक करणार आहेत.या शोमध्ये सुरूवातीपासूनच अनिता राज यांची राजमाता ही भूमिका लक्षवेधी ठरली होती. त्यामुळे पुन्हा त्याच उत्साहासह अनिता मालिकेत झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.'एक था राजा एक थी रानी' मालिकेतील पुनरागमनविषयी अनिताने सांगितले की,हा सुरूवातीपासूनच माझा आवडता शो होता. शोमध्ये ब्रेक घेतला असला तरीही मी मालिका रोज नित्यनियमाने बघत होते.त्यामुळे शोपासून मी कधी लांब गेलेच नव्हते. मला पुन्हा त्याच राजेशाही थाटात या मालिकेत आणले गेले त्यामुळे मी आमचे दिग्दर्शक प्रदिप यांचे आभार मानत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.माझ्या या एंट्रीने रसिकांचे पुन्हा एकदा मनोरंजन करता येणार असल्यामुळे माझा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील याचा इतका झाला असल्याचे सांगितले.

मालिकेतच रानीचा आत्मा नैनाच्या शरीरात प्रवेश करतो आणि राजाला राजमाताकडे घेवून जातो.तो तिला रानीच्या मृत्युचे सत्य सांगतो.राजाला फार वाईट वाटते की त्याने रानीबद्दल त्याचा फारम मोठा गैरसमज झाला आहे.कारण रानी त्याच्याच वतीने बदला घेत असते त्यातच विजय,नैनाला पळवून नेतो आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो.आपली अब्रु वाचवण्याच्या प्रयत्नाचा नैना जखमी होवून तिला अर्धांगवायूचा झटका येतो.तिला दाखल केलेल्या हॉस्पिटल मीडियाचे प्रतिनिधी येतात आणि नैनावर आरोप करत तिच्या चारित्र्यावर शंका घेतात.या सगळ्यातून नैना बाहेर पडण्यासाठी राजा मदत करेल  का? या सगळ्या गोष्टींची उत्तरे येणा-या भागात उलगणार आहेत.

Web Title: 'Ek Tha Raja Ek Tha Rani' Anita Rajchi's series of reentry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.