'बिग बॉस'चं घर भूताने पछाडेलं? अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली "आवाज ऐकू यायचे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 14:01 IST2025-03-02T14:01:41+5:302025-03-02T14:01:51+5:30
अभिनेत्रीनं 'बिग बॉस'च्या घराबद्दल एक धक्कादायक खुलासा केलाय.

'बिग बॉस'चं घर भूताने पछाडेलं? अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली "आवाज ऐकू यायचे"
Bigg Boss: 'बिग बॉस'ची नेहमीच चर्चा रंगते. या खेळाचे प्रत्येक पर्व चांगलेच गाजते. आतापर्यंत 'बिग बॉस हिंदी'ची १८ पर्व झाली आहेत. हे सर्वच पर्व धमाकेदार राहिलेत. प्रत्येक पर्वात एक वेगळीच मजा आणि धमाल होते. 'बिग बॉस' प्रेक्षकांच्या भेटीला आलं की सगळीकडे 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक, त्यांची भांडण, त्यांच्यात उमलणार प्रेम, मैत्री याची सगळीकडे चर्चा होते. यासोबतच आणखी एका विषयावर चर्चा होते. ते म्हणजे 'बिग बॉस'चं घर भूताने पछाडेलं आहे. 'बिग बॉस'घरात भूत असल्याचा दावा जवळपास प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धकाने केला आहे.
काही दिवसांपुर्वींचं 'बिग बॉस'चं अठरावं पर्व ()Bigg Boss 18 पार पडलं. हे एक पर्व धमाकेदार ठरलं. या पर्वात अभिनेत्री ईशा सिंह (Eisha Singh) सहभागी झाली होती. शो संपल्यानंतरही ईशा चर्चेत आहे. नुकतंच तिनं 'बिग बॉस'च्या घराबद्दल एक धक्कादायक खुलासा केलाय. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये बोलताना ईशानं तिला 'बिग बॉस'च्या घरात आलेला एक भयानक अनुभव सांगितला.
अभिनेत्री म्हणाली, "मी त्या घराबद्दल आधी खूप ऐकलं होतं. पण तेव्हा मला विश्वास बसला नव्हता. पण, आता त्या घरात ३ महिने राहिल्यानंतर त्यावर माझाही विश्वास बसलाय. कारण तिथं आवाज ऐकू येत होते. अनेकदा मी तुरुंगात बसायचे आणि मला असं वाटायचे की कोणीतरी तिथं उभं राहून माझ्याकडे पाहत आहे. आवाज ऐकू येत होते, विशेषतः बागेत आणि बेडरूममध्ये. तिथे एक महिला असल्याचं बोललं जातं. मला तिथं घरात एक ऊर्जाही जाणवली".
दरम्यान ईशापुर्वी अभिनव शुक्ला आणि त्याची पत्नी रुबिना दिलैक हे 'बिग बॉस १४'मध्ये सहभागी झाले होते. त्यांनीही पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी झाल्याचं सांगिलतं होतं. तसेच पवित्रा पुनियालाही घरात भुतासारखं वाटत होतं. ती म्हणाली की, एकदा ती आणि एजाज वॉशरूममध्ये असताना त्यांना वाटले की, कोणीतरी त्याच्या डोक्यावर टपली मारली. यानंतर दोघेही खूप घाबरले होते.
दरम्यान, ईशा सिंग ही टॉप ६ मध्ये पोहचली होती. पण, ती अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली. करण वीर मेहराने सर्वांना मागे टाकत शोची ट्रॉफी जिंकली. २६ वर्षांची आहे पण ती १७ वर्षांची असल्यापासून टीव्हीवर काम करत आहे. इश्क का रंग सफेद या सीरियलमध्ये तिने वयाच्या १७ व्या वर्षी एका विधवेचा रोल केला होता. तिच्या या रोलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ईशा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.