'वीण दोघातली ही तुटेना'च्या शूटवेळी सुबोध भावे तेजश्री प्रधानवर झाला नाराज, कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:49 IST2025-08-04T14:48:16+5:302025-08-04T14:49:56+5:30

Subodh Bhave : अभिनेता सुबोध भावे झी मराठीवर पुन्हा एकदा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' या नव्या मालिकेत तो समर राजवाडेची भूमिका साकारत आहेत.

During the shoot of 'Veen Doghatali Hi Tutena', Subodh Bhave got angry with Tejashree Pradhan, the reason came to light | 'वीण दोघातली ही तुटेना'च्या शूटवेळी सुबोध भावे तेजश्री प्रधानवर झाला नाराज, कारण आलं समोर

'वीण दोघातली ही तुटेना'च्या शूटवेळी सुबोध भावे तेजश्री प्रधानवर झाला नाराज, कारण आलं समोर

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) झी मराठी(Zee Marathi)वर पुन्हा एकदा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' (Veen Doghatali Hi Tutena) या नव्या मालिकेत तो समर राजवाडेची भूमिका साकारत आहेत. सुबोध भावे आणि झी मराठीचं नातं खूप जुनं आणि घट्ट आहे. त्यांनी याआधी पेशवाई,वादळवाट, कुलवधू, अवंतिका, तुला पाहते रे, बस बाई बस या आणि अधिक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप उमटवली आहे. आता तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर

अभिनेता सुबोध भावे म्हणाला की, "झी मराठी आणि माझं नातं खूप कमालीचं आहे, आतापर्यंत जवळ-जवळ १८-२० मालिका मी झी मराठीवर केल्या आहेत, आणि प्रत्येक मालिकेने मला भरभरून प्रेम उत्तम व्यक्तिरेखा, सह कलाकार, लेखक, दिग्दर्शक, टीम आणि प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम दिलं आहे. 'तुला पाहते रे'नंतर जवळपास ६ वर्षांनी पुन्हा एकदा झी मराठीवर दिसणार आहे, त्यामुळे उत्सुकता आहे. समरची भूमिका माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्ण वेगळी आहे. तो वयाच्या पंचेचाळीशीत आहे, त्याचं लग्नही नाही झालंय. लग्न करायचं नाही असे नाही, पण आता त्याची इच्छा राहिली नाहीये. खूप आनंदी आणि फ्रेश व्यक्तिरेखा आहे आणि ती निभावताना मला वाटतंय की प्रेक्षकांनाही माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे." 

मालिकेच्या निमित्ताने सुबोध आणि तेजश्री आले एकत्र

तो पुढे म्हणाला की, "मला जेव्हा चंद्रांकांत गायकवाड, कल्याणी पाठारे आणि हेमंत यांचा कॉल आला तेव्हा उत्सुकता होतीच, माझ्या वयाची भूमिका आहे, मालिका चांगली आहे सगळं माहिती होत पण प्रोमो मध्ये नक्की काय होणार आहे हे माहित नव्हतं. तेजश्री आणि मी याआधी एक सिनेमा केला होता त्यामध्ये लोकांनी आम्हाला खूप प्रेम दिलं होतं. पण आता या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र काम करणार तर त्याची ही उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोला तुफान प्रतिसाद मिळाला आहे आता उत्सुकता लागली आहे की प्रेक्षक या जोडीला आणि मालिकेला स्वीकारतील याची. मला कायम आनंद  वाटतो जेव्हा गोष्टी बारकाईने दाखवल्या जातात आणि त्यावर काम करायला मिळतं. मालिका आणि व्यतिरेखा गाजण्यासाठी लेखन महत्वाचं आहे आणि आमच्या दोन्ही लेखिकाही फार कमालीच्या आहेत." 

सुबोधनं सांगितला लग्नाच्या प्रोमोचा किस्सा

"मला लग्नाच्या प्रोमोचा एक किस्सा सांगायला आवडेल. गुलाबजामून खाण्याचा सीन होता आणि तेजश्रीने मला गुलाबजामून दाखवून खाल्ला तेव्हा मला खूप राग आला आणि समरपेक्षा जास्त सुबोधला राग आला कारण गुलाबजामून ही माझी कमजोरी आहे, माझा आवडता पदार्थ आहे. पण लग्नाचा प्रोमो शूट करताना खूप मज्जा आली. समर राजवाडेच्या काही विशेष सवयी आहेत. त्याला ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे असं म्हणू शकतो, तसे मला ही स्वछता आवडते. पण समर थोडा जास्त बारकाईने गोष्टी बघतो. मला समर राजवाडे ही व्यक्तिरेखा खूप आवडायला लागली आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना छान प्रेम कथा पाहायला मिळणार आहे.", सुबोध म्हणाला. 'वीण दोघातली ही तुटेना' ११ ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.

Web Title: During the shoot of 'Veen Doghatali Hi Tutena', Subodh Bhave got angry with Tejashree Pradhan, the reason came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.