‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर बंदी आणण्याच्या मागणीवर मूनमून दत्ताने केले खळबळजनक वक्तव्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 20:09 IST2017-09-17T14:39:55+5:302017-09-17T20:09:55+5:30

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही एकमेव अशी मालिका आहे, जी गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांना हसवित आहे. ...

Due to the ban on 'Reverse Glasses of Tarak Mehta', Mamun Datta made a stirring statement! | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर बंदी आणण्याच्या मागणीवर मूनमून दत्ताने केले खळबळजनक वक्तव्य!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर बंदी आणण्याच्या मागणीवर मूनमून दत्ताने केले खळबळजनक वक्तव्य!

ट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही एकमेव अशी मालिका आहे, जी गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांना हसवित आहे. गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने या मालिकेला प्रेक्षकांकडून पसंत केले जात आहे. मात्र आता या मालिकेविषयी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. होय, या मालिकेवर शिख समुदायाने असा आरोप लावला की, मालिकेत गुरु गोविंद सिंंगजी यांचे जीवित स्वरूप दाखविण्यात आले आहे, जे त्यांच्या धर्माच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे शिख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने तर या मालिकेवर बंदी आणण्याचीच मागणी केल्याने, एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मालिकेत बबिता नावाची भूमिका साकारणाºया मूनमून दत्ता हिला जेव्हा याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने खळबळजनक वक्तव्य करून या वादाला नवी फोडणी दिली आहे. 

बॉलिवूडलाइफ या वेबसाइटशी बोलताना मूनमून दत्ता हिने सांगितले की, ‘आज सकाळीच मी गुरूचरण सिंग यांच्याकडून या वादाविषयी ऐकले. तोपर्यंत मला याविषयी काहीही माहिती नव्हते. मला असे वाटते की, सगळ्यांचाच गैरसमज झाला असावा.’ गुरुचरण या मालिकेत ‘सोडी’ नावाची भूमिका साकारत आहे. मूनमूनने पुढे बोलताना म्हटले की, ‘गुरूचरण हे शिख समुदायाशी संबंधित आहेत. त्यामुळे ते स्वत:च असे कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करीत नाहीत, ज्यामुळे शिख समुदायांच्या भावना दुखावल्या जातील. मला चांगले आठवते की, त्या दिवशीच्या सीक्वेंसची शूटिंग करताना त्यांनी म्हटले होते की, गुरु गोविंद सिंगजी यांची भूमिका करण्याची कोणालाही परवानगी नाही. त्यानंतर त्यांनी खालसाची भूमिका साकारली. शिवाय टीव्हीवरही आम्ही हेच दाखविले. त्यामुळे जे लोक यास विरोध करीत आहेत, त्यांनी अगोदर तो एपिसोड व्यवस्थितरीत्या बघायला हवा. मला असे वाटते की, विरोध करणाºयांनी तो एपिसोड बघावा ज्यामध्ये सोडी म्हणत आहेत की, हा त्यांचा खालसा आहे.’



पुढे बोलताना मूनमून म्हणते की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेची जमेची बाजू ही आहे की, यामध्ये प्रत्येक संस्कृती आणि धर्माच्या लोकांना दाखविण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला ही बाब नेहमीच लक्षात ठेवावी लागते की, कधीही आमच्या डायलॉग किंवा कृत्यामुळे कोणाच्या भावनांना धक्का लागू नये. ही मालिका गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच ही मालिका दीर्घकाळ चालू शकली. त्यामुळे आमची अशी कधीच इच्छा नसेल की, या मालिकेमुळे देशातील कुठल्याही समुदायाची भावना दुखावली जावी.’

Web Title: Due to the ban on 'Reverse Glasses of Tarak Mehta', Mamun Datta made a stirring statement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.