उतारवयात पूर्ण झाले स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 13:53 IST2016-10-04T08:23:51+5:302016-10-04T13:53:51+5:30
जिंदगी की महक या मालिकेत कांता ही भूमिका साकारणाऱ्या किरण शर्माच्या अभिनयाचे सध्या सगळेच कौतुक करत आहेत. पण इथपर्यंत ...

उतारवयात पूर्ण झाले स्वप्न
ज ंदगी की महक या मालिकेत कांता ही भूमिका साकारणाऱ्या किरण शर्माच्या अभिनयाचे सध्या सगळेच कौतुक करत आहेत. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूपच संघर्ष करावा लागला असे त्या सांगतात. त्यांनी आज लेखन, दिग्दर्शन, कॉस्च्युम डिझायनिंग यांसारख्या विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. पण या इंडस्ट्रीतील त्यांचा प्रवास खूपच खडतर होता. त्या सांगतात, "मी तरुण असल्यापासून अभिनय करायचे असे माझे स्वप्न होते. पण आज उतारवयात या मालिकेमुळे माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. माझा जन्म एका छोट्या शहरात झाला. आमच्याकडे अभिनय करणे हे खूप वाईट समजले जात असे. त्यामुळे माझ्या कुटुंबाने मला या इंडस्ट्रीत येण्यासाठी कधीच पाठिंबा दिला नाही. माझ्या खिशात केवळ 1000 रुपये असताना कोणताही मागचा पुढचा विचार न करता मी माझ्या स्ट्रगलला सुरुवात केली. मी रंगभूमीवर काम करायला लागली तो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला."