बॉलिवूड डेब्यूसाठी आणखी एक टीव्ही अभिनेत्री सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 20:30 IST2019-04-10T20:30:00+5:302019-04-10T20:30:00+5:30
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणेच तिच्या ऑफस्क्रीन लूकलाही भरघोस पसंती मिळत आहे.

बॉलिवूड डेब्यूसाठी आणखी एक टीव्ही अभिनेत्री सज्ज
टीव्ही इंडस्ट्रीत दृष्टी धामीने आपल्या अभिनयानेच नाही तर आपल्या ग्लॅमरस अंदाजाने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'सिलसिला बदलते रिश्तों का' मालिकेमुळे ती घराघरात पोहचली. आता दृष्टीला त्याच त्या साचेबद्ध पठडीतील कामात अडकायचे नसून काही तरी हटके करण्याची इच्छा आहे. म्हणूनच तिने मालिका सोडली असून आता मालिकेत काम करणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
तर दुसरीकडे दृष्टी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत वाहवा मिळवत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये सगळ्या आकर्षक ठरते तिची हेअर स्टाईल. या हेअर स्टाईलमुळे ती अधिक ग्लॅमरस दिसत असून तिच्या या फोटोंना खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणेच तिच्या ऑफस्क्रीन लूकलाही भरघोस पसंती मिळत आहे. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर दृष्टीचा बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
पहिल्यांदाच ग्लॅमरस अंदाजात दृष्टी धामीने फोटो शेअर केले आहेत असे नाही तर याआधीही तिने तिचे खास फोटोशूट केले आहे. तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटो कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील. आता या नवीन फोटोशूटमुळे तिलाही इतर टीव्ही अभिनेत्रींप्रमाणे बॉलिवूड डेब्युचे वेध लागल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आगामी काळात दृष्टी देखील कोणत्या बॉलिवूड सिनेमात झळकल्यास आश्वचर्य वाटायला नको.