सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 06:00 IST2018-10-23T13:28:29+5:302018-10-24T06:00:00+5:30
दृष्टी धामीच्या सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेतील लूकवर स्वतः ती मेहनत घेत आहे. तिचा लुक कसा असेल यावर ती लक्ष देते. नंदिनीच्या लूकमध्ये कोणत्याही गोष्टीची तडजोड करावी लागू नये याची खात्री दृष्टी धामी करून घेते.

सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत
अभिनेत्री दृष्टी धामी सध्या कलर्स वाहिनीवरच्या सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत नंदिनी राजदीप ठाकूर ही भूमिका साकारत आहे. दृष्टी तिच्या स्टाइलसाठी ओळखली जाते. दृष्टी धामीचा सिलसिला बदलते रिश्तों का मधील पारंपरिक भारतीय लुक प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. ती या लूकमध्ये खूपच छान दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे आणि तिच्या रंगबेरंगी भरतकाम केलेल्या साड्या तसेच उठावदार दागिने ती अतिशय आत्मविश्वासाने घालून वावरत असल्याचे देखील त्यांचे म्हणणे आहे.
दृष्टी धामीच्या या मालिकेतील लूकवर स्वतः ती मेहनत घेत आहे. तिचा लुक कसा असेल यावर ती लक्ष देते. नंदिनीच्या लूकमध्ये कोणत्याही गोष्टीची तडजोड करावी लागू नये याची खात्री दृष्टी धामी करून घेते. तिच्या कपड्यांना जुळणारे दागिने असतील याचीही ती खात्री करत असते. यावर बोलताना दृष्टी धामी सांगते, “मी कार्यक्रमात कोणते कपडे घालते, दागिने घालते याविषयी मी अगदी काटेकोर असते. मला वाटते की माझे स्वतःचे दागिने घातल्यामुळे त्या पात्राला एक वैयक्तिक स्पर्श मिळतो आणि माझे स्वतःचे दागिने घालणे मला जास्त आरामदायी वाटते. नंदिनीच्या लुकसाठी प्रेक्षकांची प्रशंसा मिळत आहे हे पाहून तर मला माझ्या स्टायलिंग क्षमतेविषयी अधिक आत्मविश्वास वाटत आहे.”
या मालिकेत सध्या कुणाल (शक्ती अरोरा) नंदिनीसाठी (द्राष्टी धामी) मौलीला (अदिती शर्मा) कसा सोडून जातो आणि समाजातून अवहेलना चालू असली तरी त्यांचे हे संबंध पुढे चालू राहतात. दिदा आणि राधिका, मौली आणि कुणाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी एक धक्कादायक बातमी उघड होते की मौली कुणालच्या बाळाची आई होणार असते. मौली कुणाला गरोदर असल्याची बातमी सांगत नाही पण त्याऐवजी ती नंदिनीला कुणालला सोडून जाण्यासाठी सांगते. उलट मौली आणि तिच्या कुटुंबाच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे कुणालचे नंदिनी वरील प्रेम वाढतच चालले आहे. कुणालला आपल्या जीवनात परत आणण्यासाठी मौली त्याला गरोदर असल्याची बातमी सांगते की नाही हे पाहणे रोमांचक असणार आहे.