​​द ड्रामा कंपनी फेम संकेत भोसलेला त्याचे अश्रू का आवरले नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:15 IST2017-09-08T11:45:16+5:302017-09-08T17:15:16+5:30

भूमी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संजय दत्त, आदिती राव, हर्षी, शरद केळकर आणि ओमंग कुमार या कलाकारांनी नुकतीच द ड्रामा कंपनीच्या ...

The Drama Company Fame signaled why its tears were not stopped? | ​​द ड्रामा कंपनी फेम संकेत भोसलेला त्याचे अश्रू का आवरले नाहीत?

​​द ड्रामा कंपनी फेम संकेत भोसलेला त्याचे अश्रू का आवरले नाहीत?

मी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संजय दत्त, आदिती राव, हर्षी, शरद केळकर आणि ओमंग कुमार या कलाकारांनी नुकतीच द ड्रामा कंपनीच्या सेटवर हजेरी लावली होती. त्यावेळी या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्यावेळी डॉ. संकेत भोसले चांगलाच खूश होता. कारण तो लहान असल्यापासूनच संजय दत्तला आपला आदर्श मानतो. त्याची मिमिक्री तो उत्कृष्टरित्या करतो. संजय दत्त चित्रीकरणासाठी येणार आहे हे कळल्यावर त्याच्या आनंदाला पारावरच उरला नव्हता. आपला परफॉर्मन्स सगळ्यात चांगला व्हावा यासाठी त्याने सर्वस्वी प्रयत्न केला. त्याचा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर तो आपले आनंदाश्रू थांबवू शकला नाही. संकेत भावुक झाला आहे हे संजय दत्तला कळताच त्याने स्टेजवर येऊन लगेचच संजयला जादू की झप्पी दिली. याविषयी संकेत सांगतो, लहानपणापासून मी संजय दत्त यांचे सगळेच चित्रपट पाहिले आहेत. संजय दत्त यांच्या खलनायक ते वास्तवपर्यंत सगळ्याच चित्रपटातील भूमिकांची मी मिमिक्री करत आलो आहे. त्यांच्यासारखीच हेअर स्टाइल मी अनेकवेळा ठेवत असे. मी संजय दत्त यांचा एवढा मोठा चाहता होतो की, शाळेत असताना माझे लांब केस झाकण्यासाठी माझी आई टोपीच्या खाली केस गुंडाळत असे. संजय दत्त सेटवर येणार हे ज्यावेळी मला कळले तेव्हा मला खूप आनंद झाला होता. आपल्याला लहानपणापासून जी व्यक्ती आवडते, त्याला भेटणे, त्याच्यासमोर आपली कला सादर करणे याचा आनंद काही वेगळाच असतो. हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. त्यामुळे मी परफॉर्मन्स सादर करताना प्रचंड भावूक झालो होतो. 

Also Read : रणबीर कपूरने संजय दत्तच्या बायोपिकसाठी डॉ.संकेत भोसलेकडून घेतल्या टिप्स

Web Title: The Drama Company Fame signaled why its tears were not stopped?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.