डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणार छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 15:04 IST2019-02-18T15:03:52+5:302019-02-18T15:04:15+5:30
स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘भीमराव’ एक गौरव गाथा या मालिकेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट पाहायला मिळणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणार छोट्या पडद्यावर
भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातील एक महान पर्व आहे. इतिहासाचे हे सोनेरी पान पुन्हा उलगडले जाणार आहे. स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘भीमराव’ एक गौरव गाथा या मालिकेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट पाहायला मिळणार आहे.
सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. महामानवाचे हे महान कार्य मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न स्टार प्रवाह वाहिनी करणार आहे.
१४ एप्रिलला म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.