DP निक्कीशी बोलायला गेला अन् B टीममध्ये वाद झाला, अंकिताने विचारला धनंजयला जाब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:11 IST2024-08-26T11:11:15+5:302024-08-26T11:11:45+5:30

धनंजय पोवार अर्थात DP निक्कीशी बोलायला गेल्याने अंकिता चिडली असून तिने धनंजय पोवारला त्याविषयी विचारलं

DP dhananjay powar goes to talk to Nikki tamboli ankita walawalkar angry in bigg boss marathi 5 | DP निक्कीशी बोलायला गेला अन् B टीममध्ये वाद झाला, अंकिताने विचारला धनंजयला जाब!

DP निक्कीशी बोलायला गेला अन् B टीममध्ये वाद झाला, अंकिताने विचारला धनंजयला जाब!

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज पाचवा आठवडा सुरु झालाय. काल बिग बॉसच्या घरातून इरिना रुडाकोवाला घराबाहेर जावं लागलं. इरिना घराबाहेर गेल्यानंतर आज बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पाचव्या आठवड्यात काय कल्ला बघायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. अशातच पाचव्या आठवड्याचे प्रोमो रिलीज झालेत. या प्रोमोत B टीममध्ये वादाची ठिणगी उडाली असल्याचं पाहायला मिळालं. 

धनंजय निक्कीशी बोलायला गेला अन् B टीम चिडली

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये बघायला मिळतंय की, धनंजय निक्कीशी बोलायला गेल्याने अंकिताने त्याला विचारलं, "तुम्ही निक्कीला जाऊन विचारलं की आर्या तुझ्याशी काय बोलली?" यावर DP होकार देतो. अंकिता त्याला कारण विचारते. त्यावर DP म्हणतो, "माझी मर्जी." त्यावर अंकिता म्हणाली की, "निक्की मला सांगत होती की, DP दादा मला विचारत होते की आर्या काय बोलली. तर मागून कशाला, समोरासमोर येऊन विचारा."


DP ने दिलं अंकिताला उत्तर

धनंजयने पुढे उत्तर दिलं की, "काय बोलणं चालू होतं हे विचारलं मी निक्कीला. अरे मी गेलो नव्हतो तिच्याकडे. ती येऊन माझ्याशी काहीतरी बोलत होती. तिकडे तो विषय निघाला की, काय झालं बोलणं तुमच्यात. एकमेकीला नागिनीसारखं बघणाऱ्या तुम्ही दोघीजणी अचानक तुम्ही बोलत बसला तर मला विचारावंसं वाटलं आणि मी विचारलं. आता घरात मी कोणाशी बोलण्याआधी तुम्हाला विचारु का?" अशाप्रकारे B टीम धनंजयवर काहीशी नाराज दिसली.

Web Title: DP dhananjay powar goes to talk to Nikki tamboli ankita walawalkar angry in bigg boss marathi 5