'तू लग्न करु नकोस गं...',प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 17:36 IST2022-04-20T17:25:06+5:302022-04-20T17:36:07+5:30

. सोशल मीडियावर प्राजक्ता प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. आज ती लाखो मुलांच्या गळ्यातील ताईत आहे. प्राजक्ताचे सोशल मीडियावर १.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

'Don't get married ...', fans' abandoned comments on Prajakta Mali's post | 'तू लग्न करु नकोस गं...',प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

'तू लग्न करु नकोस गं...',प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali)अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य, दिलकश अदा आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनलीये. सोशल मीडियावर प्राजक्ता प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. आज ती लाखो मुलांच्या गळ्यातील ताईत आहे. प्राजक्ताचे सोशल मीडियावर १.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. प्राजक्ता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे ग्लॅमरस फोटोशूट असते.

नुकतीच तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीये. ही पोस्ट नववधूची आहे. गैरसमज नको प्राजक्ताचं लग्न ठरलेलं नाही तर प्राजक्ताने नुकतीच एका लग्नाला हजेरी लावली. तेव्हा तिथं नववधूसोबतचे फोटो तिनं शेअर केलेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलय की, नववधू...अजून एकाचा बळी असो…नवीन आयूष्यासाठी खूप शुभेच्छा ...खूप प्रेम श्रद्धा काकडे

शेवटचे 2 फोटो चुकवू नका, कारण आम्ही fake candids देण्यात आम्ही कौशल्य प्राप्त केले आहे...विनायक जाधव तुला मिस करतोय. अशी कॅप्शन दिलीये...या पोस्टखाली चाहत्यांनी मजेशीर कमेंटस केल्या आहेत.तू घाई करू नको ग,इथे तुझ्यासाठी संघर्ष चालू आहे,थोडा वेळ हवा आहे...बस तू लग्न करु नकोस गं... प्राजक्ता तु कधी लग्न करणार...मस्तच. मेनु काय होता. लग्नाचं जेवण म्हणजे चवीची पर्वणी. अशा एकापेक्षा एक मजेशीर कमेटस तिच्या या पोस्टवर पहायला मिळतायेत. 
 

Web Title: 'Don't get married ...', fans' abandoned comments on Prajakta Mali's post