डॉली बनली पेंटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 10:55 IST2016-07-04T05:25:06+5:302016-07-04T10:55:06+5:30
कलश या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी डॉली सोही सध्या चित्र काढण्यातही रमली आहे. डॉलीला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. पण ...

डॉली बनली पेंटर
क श या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी डॉली सोही सध्या चित्र काढण्यातही रमली आहे. डॉलीला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. पण कामात व्यग्र असल्याने तिला कधी तिची ही आवड जोपासता आली नाही. सध्या ती चित्रीकरणाच्या दरम्यान मिळणारा वेळ हा चित्रकलेस देत आहे. डॉलीची मुलगी काही दिवसांपूर्वी कॅनडाला गेली होती. मुलगी नसल्याने घरी वेळ कसा घालवायचा हेच तिला कळत नव्हते. त्यामुळे तिने इतक्या वर्षांनी पुन्हा चित्र काढायला सुरुवात केली. डॉलीने लहानपणी चित्रकलेचे धडे गिरवले आहेत. पण आता एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीकडून चित्रकला शिकायची असे तिने ठरवले आहे. चित्रीकरणातून वेळ काढून मी लवकरच चित्रकला शिकणार असल्याचे ती सांगते.