​क्या तू मेरी लागे या मालिकेद्वारे संजिदा शेख करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2017 10:29 IST2017-03-06T04:59:18+5:302017-03-06T10:29:18+5:30

छोट्या पडद्यावर सध्या अनेक कलाकार आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. सिंदूर तेरे नाम का, सात फेरे या मालिकांमध्ये ...

Do you want to marry Sanjida by doing this series? | ​क्या तू मेरी लागे या मालिकेद्वारे संजिदा शेख करणार कमबॅक

​क्या तू मेरी लागे या मालिकेद्वारे संजिदा शेख करणार कमबॅक

ट्या पडद्यावर सध्या अनेक कलाकार आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. सिंदूर तेरे नाम का, सात फेरे या मालिकांमध्ये झळकलेली किर्ती गायकवाड-केळकर ससुराल सिमर का या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. तर तस्नीम शेख एक विवाह ऐसा भी या मालिकेद्वारे नऊ वषानंतर छोट्या पडद्यावर परतली आहे. क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेतील अंश या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला आकाशदीप सेहगल शेर-ए-पंजाबः महाराजा रणजितसिंग या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.या कलाकारांच्या यादीमध्ये आता आणखी एका नावाची भर पडणार आहे.
क्या होगा निम्मो का, एक हसिना थी यांसारख्या मालिकांमुळे नावारूपाला आलेली संजिदा शेख लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. संजिदाने काही महिन्यांपूर्वी इश्का का रंग सफेद या मालिकेत काम केले होते. आता ती स्टार वाहिनीवरील एका कार्यक्रमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचे नाव क्या तू मेरी लागे असे असून या कार्यक्रमात तिच्यासोबत किथ सिक्वेरा झळकणार आहे. सध्या या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ती राजस्थानला गेली आहे. राजस्थानधील खिमसर किल्ल्यात या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. संजिदाने या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करून तिच्या कमबॅकबद्दल तिच्या फॅन्सना सांगितले आहे. 
क्या तू मेरी लागे या मालिकेची निर्मिती सिद्धार्थ मल्होत्रा करणार असून या मालिकेत संजिदा आणि किथसोबतच सारा खान, शिशिर शर्मा आणि योगेंद्र टिकू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: Do you want to marry Sanjida by doing this series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.