​सोनूनंतर आता मुन्नू तुझा माझ्यावर भरोसा नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 15:32 IST2017-07-25T10:02:42+5:302017-07-25T15:32:42+5:30

​सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? हे गाणे सध्या चांगलेच गाजत आहे. आता अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेच्या टीमने ​मुन्नू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? हे गाणे बनवले असून सोशल मीडियावर या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Do you trust Me then after the Son? | ​सोनूनंतर आता मुन्नू तुझा माझ्यावर भरोसा नाही का?

​सोनूनंतर आता मुन्नू तुझा माझ्यावर भरोसा नाही का?

नूची क्रेझ सध्या आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळत आहे. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? हे गीत सध्या अनेक भाषांमध्ये बनवले जात आहे आणि या गीताला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोनूनंतर आता मुन्नू आला असून या मुन्नूला देखील सोशल मीडियावर लोकांनी डोक्यावर घेतले आहे. 
अस्सं सासर सुरेख बाईच्या टीमने मिळून मुन्नू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? हा व्हिडिओ तयार केला आहे. या मालिकेत सध्या हेमाच्या लग्नाची लगबग सुरू आहे. या लग्नाच्या निमित्तानेच हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आपल्याला मालिकेची संपूर्ण टीम पाहायला मिळत आहे.
मृणाल दुसानिसला मुन्नू म्हणतात त्यामुळेच या व्हिडिओत सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? या ऐवजी मुन्नू तुझा माझ्यावर भरोसा नाही का असे शब्द वापरण्यात आले आहेत. या व्हिडिओमधील सगळी वाक्यं देखील अस्सं सासर सुरेख बाईच्या मालिकेला अनुसरूनच घेण्यात आली आहेत आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ संपण्याच्या काही सेंकद आधी माझा तुमच्यावर भरोसा नाही असे देखील मुन्नू सांगत आहे. 
हा व्हिडिओ शेअर करून केवळ काहीच दिवस झाले आहेत आणि या व्हिडिओला जवळजवळ चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. 
अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेच्या कथानकाला काही दिवसांपूर्वी चांगलेच वळण मिळालेले आहे. यशचा एका अपघातात मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे महाजन कुटुंबातील सगळेच खूप दुःखी आहेत. पण आता हेमाच्या लग्नामुळे एक आनंदी वातावरण त्यांच्या घरात निर्माण होणार आहे. 



Also Read : अमेरिकेत सेटल व्हायचा प्रश्नच नाहीये : मृणाल दुसानीस

Web Title: Do you trust Me then after the Son?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.