चष्मा घातलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? बोल्डनेसमुळे होते मराठी इंडस्ट्रीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:35 IST2023-10-30T11:33:48+5:302023-10-30T11:35:19+5:30
Marathi actress: या अभिनेत्रीने 'रंग माझा वेगळा' या गाजलेल्या मालिकेतही काम केलं आहे.

चष्मा घातलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? बोल्डनेसमुळे होते मराठी इंडस्ट्रीत चर्चा
सध्याच्या काळात अनेक कलाकार चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतात. त्यामुळे बऱ्याचदा ते सोशल मीडियाचा आधार घेतात. ही कलाकार मंडळी खासकरुन त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या पर्सनल आयुष्यातील किस्से, प्रसंग वा एखादी घटना सुद्धा नेटकऱ्यांसोबत शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा शालेय जीवनातील फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून कोणीही तिला ओळखू शकलेलं नाही.
सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. तिचा हा फोटो शालेय जीवनातील असून यात तिने चष्मा लावला आहे. सोबतच केसांना तेल लावून चापून चोपून वेणीही घातली आहे. तिचा हा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. इतकंच नाही तर ही अभिनेत्री कोण असेल असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
व्हायरल होत असलेला हा फोटो अभिनेत्री विदिशा म्हसकर हिचा आहे. विदिशा आज मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विदिशाने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. विदिशाने रंग माझा वेगळा या मालिकेत आयशा ही भूमिका साकारली होती. तर सध्या ती ३६ गुणी जोडी या मालिकेत सारिका बडवाईक ही भूमिका साकारताना दिसत आहे.