घाडगे & सून मालिकेमध्ये दिवाळीचे सेलिब्रेशन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 09:59 IST2017-10-18T04:29:37+5:302017-10-18T09:59:37+5:30

दिवाळी जवळ आली कि, चहूबाजूला चैतन्यमय वातावरण असते. कंदील, पणत्या, घराची रंगरंगोटी – साफसफाई, कपड्यांची खरेदी सुरु होते. याचबरोबर ...

Diwali Celebration in Ghadge & Soon series! | घाडगे & सून मालिकेमध्ये दिवाळीचे सेलिब्रेशन !

घाडगे & सून मालिकेमध्ये दिवाळीचे सेलिब्रेशन !

वाळी जवळ आली कि, चहूबाजूला चैतन्यमय वातावरण असते. कंदील, पणत्या, घराची रंगरंगोटी – साफसफाई, कपड्यांची खरेदी सुरु होते. याचबरोबर दिवाळीमध्ये सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यांना प्रिय असतो तो म्हणजे फराळ शंकरपाळी, चकल्या, चिवडा, अनारसे याची तयारी देखील सुरु होते. प्रत्येकाच्याच घरासमोर सुंदर अश्या रांगोळ्या काढल्या जातात. कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घाडगे & सून मध्ये देखील दिवाळीची अशीच धमाल सुरु आहे निमित्त म्हणजे माईच्या लाडक्या अक्षयचा पहिला पाडवा. माई स्वत: फराळ करण्यास सगळ्यांना मदत करत आहेत, घराला नवीन रंग देण्यात आला आहे. सेटवर भाग्यश्री, शर्मिष्ठा आणि अमृता यांनी मिळून सुंदर रांगोळी काढली. माईंनी सगळ्यांना कामे वाटून दिलेली आहेत. सेटवर आणि मालिकेमध्ये देवाळीची जय्यत तयारी सुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. सेटवर सगळ्यांनीच एकत्र येऊन हा सण साजरा केला. 

घाडगे & सून मालिकेमध्ये नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा हे दिवस साजरे केले जाणार आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी माईंनी अक्षयला उटणे लावले, घरातील पुरुष मंडळींचे औक्षण केले. तसेच प्रेक्षकांना मालिकेमध्ये लक्ष्मीपूजन देखील बघायला मिळणार आहे. अक्षय आणि अमृताचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे सगळ्यांनाच माहिती असून आता दोघांमध्येही मैत्रीच्या नव्या नात्याची सुरुवात झालेली आहे. दिवाळीमध्ये अमृता आणि अक्षय दोघांनी मिळून घराची सजावट केली आहे. घाडग्यांच्या सुनेचा पहिला पाडवा असल्यामुळे तिला साडी, सौभाग्याचं लेणं आणि एक दागिना माईनी भेट म्हणून दिला.  आतापर्यंत घाडगे  & सूनमध्ये आतापर्यंत प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहेत. 

घाडगे & सून या मालिकेत सध्या प्रेक्षकांना भाग्यश्री लिमये आणि चिन्मय उद्गिरकरची जोडी पाहायला मिळत आहे. ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.  भाग्यश्री लिमयेची ही पहिलीच मालिका आहे. भाग्यश्री ही मुळची सोलापूरची असून तिचे शिक्षण पुण्यामध्ये झाले आहे. कॉलेजमध्ये असताना भाग्यश्री आणि तिच्या एका मैत्रिणीचे चिन्मय उद्गिरकर क्रश होते, त्यांना तो खूपच आवडायचा.
 

Web Title: Diwali Celebration in Ghadge & Soon series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.