दिव्यांका त्रिपाठी दिसणार नव्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 16:23 IST2018-09-07T16:20:19+5:302018-09-07T16:23:46+5:30

छोट्या पडद्यावरील मालिका ये है मोहब्बतेमध्ये इशिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. आता ती वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Divyanka Tripathi will be seen in new role | दिव्यांका त्रिपाठी दिसणार नव्या भूमिकेत

दिव्यांका त्रिपाठी दिसणार नव्या भूमिकेत

ठळक मुद्देएकता कपूरच्या आगामी वेबसीरिजमध्ये झळकणार दिव्यांका दिव्यांका साकारणार शेफची भूमिका


छोट्या पडद्यावरील मालिका 'ये है मोहब्बते'मध्ये इशिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. या भूमिकेतून ती लोकप्रिय झाली आहे. शिवाय तिला चाहत्यांचे भरभरून प्रेमही मिळाले आहे. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ही मालिका जरी संपली तरीदेखील दिव्यांका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती शेफच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

छोट्या पडद्यावर लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणाऱ्या एकता कपूरच्या आगामी एका वेबसीरिजमध्ये दिव्यांका त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजचे नाव शेफ असे असून यात दिव्यांका एका शेफच्या भूमिकेत झळकणार आहे. या सीरिजचे चित्रीकरण सुरु झाले आहे. मात्र अद्याप एकताने या सीरिजची घोषणा अधिकृतरित्या केलेली नाही.
मात्र एकता कपूरने सोशल मीडियावर ट्विट केले की, ठीक आहे. लोकांना याबद्दल समजले आहे. दोन शेफ एकमेकांच्या प्रेमात पडतात व प्रेमात धोका मिळतो. त्यानंतर दुखावलेले हे शेफ खाण्यावर प्रेम करू लागतात. जास्त प्रेमकथा या किचनमध्ये संपतात पण इथे किचनमधूनच प्रेमकथा सुरू होते.
‘ये है मोहब्बते’ या मालिकेची निर्मितीही एकता कपूरने केली असून तिने तिच्या आगामी वेबसीरिजसाठीही दिव्यांकाची निवड केली आहे. ‘ये है मोहब्बते’ ही लोकप्रिय मालिका येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये बंद होणार आहे. त्यामुळे पाच वर्षापासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून आता ही मालिका निरोप घेणार आहे, हे समजल्यावर त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. दिव्यांकाला शेफच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे.

 

Web Title: Divyanka Tripathi will be seen in new role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.