‘द व्हॉइस’चे सूत्रसंचालन दिव्यांका त्रिपाठीऐवजी आता करणार हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 06:30 IST2019-04-25T06:30:00+5:302019-04-25T06:30:02+5:30

दिव्यांकाच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. आता दिव्यांका नव्हे तर छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता द व्हॉइस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. 

Divyanka Tripathi OUT, Karan Wahi IN for The Voice | ‘द व्हॉइस’चे सूत्रसंचालन दिव्यांका त्रिपाठीऐवजी आता करणार हा अभिनेता

‘द व्हॉइस’चे सूत्रसंचालन दिव्यांका त्रिपाठीऐवजी आता करणार हा अभिनेता

ठळक मुद्देकरण केवळ उत्तम अभिनेताच आहे असे नव्हे, तर तो एक चांगला सूत्रसंचालक म्हणूनही प्रसिद्ध आहे. यापूर्वी त्याने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले असून आता ‘द व्हॉइस’च्या आगामी भागांच्या सूत्रसंचालनासाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

द व्हॉइस या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या स्पर्धकांनी केलेले गाण्यांचे दमदार सादरीकरण आणि अनेक नामवंत प्रशिक्षकांच्या मौलिक सूचनांमुळे या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या कार्यक्रमात दिव्यांका त्रिपाठी सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे. दिव्यांका ही एक चांगली अभिनेत्री असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण या कार्यक्रमामुळे तिची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पण तिच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. आता दिव्यांका नव्हे तर अभिनेता करण वाही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. 

करण वाहीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तो केवळ उत्तम अभिनेताच आहे असे नव्हे, तर तो एक चांगला सूत्रसंचालक म्हणूनही प्रसिद्ध आहे. यापूर्वी त्याने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले असून आता ‘द व्हॉइस’च्या आगामी भागांच्या सूत्रसंचालनासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच दिव्यांका त्रिपाठी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होती आणि प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील तिला मिळत होता. 

पण आता तिच्या काही वैयक्तिक कामांमुळे तिला या कार्यक्रमाच्या पुढील भागांचे सूत्रसंचालन करणे शक्य होणार नाहीये असे तिने कार्यक्रमाच्या टीमला काही दिवसांपूर्वी कळवले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या टीमने आता करण वाहीची निवड केली आहे. याबद्दल प्रतिक्रिया देताना करण सांगतो, “या कार्यक्रमात मला भाग घेता येत असल्याबद्दल मी खूपच आनंदित आहे. मला सूत्रसंचालन करायला आवडतं आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना मला खूपच मजा येत आहे. यातील सर्वच स्पर्धक अतिशय गुणवान आहेत आणि त्यांना प्रत्यक्ष गाताना पाहणं हा माझ्यासाठी खूपच चांगला अनुभव आहे.”

करणचे चाहते द व्हॉइस कार्यक्रमातील करणच्या वैशिष्ट्यपूर्ण सूत्रसंचालनाची आतुरतेने वाट पाहात आहेत यात काहीच शंका नाही. हा कार्यक्रम प्रेक्षकांना शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता ‘स्टार प्लस’वर पाहायला मिळत आहे.

Web Title: Divyanka Tripathi OUT, Karan Wahi IN for The Voice