"मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं...", दिव्या शिंदेचा गौप्यस्फोट, बिग बॉसवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:35 IST2026-02-12T12:32:56+5:302026-02-12T12:35:47+5:30
दिव्याने घरातील स्पर्धकांना तलवारीने मारण्याची धमकी दिल्यामुळे तिला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला होता. घरातून बाहेर आल्यानंतर दिव्याने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली आहे. याबरोबरच दिव्याने बिग बॉसवर गंभीर आरोप केले आहेत.

"मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं...", दिव्या शिंदेचा गौप्यस्फोट, बिग बॉसवर गंभीर आरोप
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरातून दिव्या शिंदेला अचानक एक्झिट घ्यावी लागली होती. दिव्याने घरातील स्पर्धकांना तलवारीने मारण्याची धमकी दिल्यामुळे तिला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला होता. घरातून बाहेर आल्यानंतर दिव्याने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली आहे. याबरोबरच दिव्याने बिग बॉसवर गंभीर आरोप केले आहेत.
"बिग बॉससाठी निवड कशी झाली होती?" या प्रश्नावर उत्तर देताना दिव्याने बिग बॉसवर आरोप केले. ती म्हणाली, "बिग बॉसची टीम माझ्याकडे आली होती. आमच्या तीन मिटिंग्स झाल्या होत्या. मी काही अटी घातल्या होत्या. त्यांनी त्या मान्यही केल्या होत्या. मी नुकतीच आजारपणातून उठले होते. मला आराम करायला वेळ मिळाला नव्हता. मी त्यांना माझ्या आजारपणाबद्दलही सांगितलं होतं. मी यासाठी फिजिकली फिट नाही, हे मी त्यांना बोलले होते. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमची काळजी घेऊ. काळजी तर त्यांनी घेतली नाही. दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं जेव्हा मी मरत होते. मरणाच्या दारात पोहोचली होती. बिग बॉसच्या घरात माझी ऑक्सिजन लेव्हल कमी होत होती. दोन दिवसानंतर मला इंजेक्शन देण्यात आलं जेव्हा मी जोरजोरात रडत होते. माझ्या हेल्थचीही काही काळजी घेतली गेली नाही. जे प्रॉमिस केलं होतं त्यांनी तेही पूर्ण केलं नाही".
दिव्याने बिग बॉसवर पूर्ण फुजेट न दाखवल्याचाही आरोप केला आहे. याशिवाय बिग बॉसने मला निष्कासित केलं नाही तर मी स्वत: शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, असंही दिव्या प्रत्रकार परिषदेत म्हणाली. आता यावर बिग बॉसच्या टीमकडून काही खुलासा करण्यात येणार का? बिग बॉस आपली बाजू मांडणार का? हे पाहावं लागेल.