​इच्छाधारी नागिन या मालिकेत शीला शर्मा घेणार दिव्याज्योती शर्माची जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 17:15 IST2017-01-25T11:45:21+5:302017-01-25T17:15:21+5:30

मालिकांमध्ये एखाद्या कलाकारांने एखाद्या कलाकारांला रिप्लेस करणे यात काही नवीन नाही. कलाकारांची रिप्लेसमेंट झाल्यानंतर काही वेळा मालिकेचा टीआरपी ढासळतो ...

Divya Jyoti Sharma's place to take Sheela Sharma in the series of Yashchhari Nagin | ​इच्छाधारी नागिन या मालिकेत शीला शर्मा घेणार दिव्याज्योती शर्माची जागा

​इच्छाधारी नागिन या मालिकेत शीला शर्मा घेणार दिव्याज्योती शर्माची जागा

लिकांमध्ये एखाद्या कलाकारांने एखाद्या कलाकारांला रिप्लेस करणे यात काही नवीन नाही. कलाकारांची रिप्लेसमेंट झाल्यानंतर काही वेळा मालिकेचा टीआरपी ढासळतो तर काही वेळा नवीन कलाकाराच्या एंट्रीमुळे मालिकेच्या टीआरपीवर चांगलाच फरक पडतो. त्यामुळे कोणत्याही कलाकाराची रिप्लेसमेंट होणे हे मालिकेसाठी धोकादायकच असते.
आता इच्छाधारी नागिन या मालिकेतदेखील प्रेक्षकांना एक रिप्लेसमेंट पाहायला मिळणार आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेची संकल्पना आणि मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. मालिका प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली जागा बनवत असतानाच मालिकेत पहिली रिप्लेसमेंट होणार आहे. या मालिकेत छांछल प्रतापची भूमिका दिव्यज्योती शर्मा साकारते. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. पण आता तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Divyajyotee Sharma
दिव्यज्योतीने कोणत्याही वादामुळे नव्हे तर काही वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका सोडण्याचे ठरवले आहे. तिची काही वैयक्तिक कामे असल्याने ती या मालिकेच्या चित्रीकरणाला वेळ देऊ शकत नाही असे तिने मालिकेच्या टीमला नुकतेच कळवले होते. त्यामुळे तिची जागा घेण्यासाठी टीम एका अभिनेत्रीच्या शोधात होती आणि आता या मालिकेत तिची जागा शीला शर्मा घेणार असल्याचे कळतेय.
शीलाने चमत्कारसारख्या प्रसिद्ध मालिकेत फारुक शेख यांच्यासोबत काम केले होते. तसेच ती हम साथ साथ है, चोरी चोरी छुपके छुपके, यस बॉस यांसारख्या चित्रपटात झळकली होती. 
प्रेक्षक दिव्यज्योतीच्या ऐवजी शीला शर्माला छांछल या भूमिकेत स्वीकरतील का हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Web Title: Divya Jyoti Sharma's place to take Sheela Sharma in the series of Yashchhari Nagin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.