उपासना घेणार घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:17 IST2016-10-13T07:59:20+5:302016-10-15T17:17:20+5:30
कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामधील लग्न करण्यास उतावीळ असणारी बुवा म्हणजेच उपासना सिंग तिच्या खऱ्या आयुष्यात लवकरच घटस्फोट ...
.jpg)
उपासना घेणार घटस्फोट
क मेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामधील लग्न करण्यास उतावीळ असणारी बुवा म्हणजेच उपासना सिंग तिच्या खऱ्या आयुष्यात लवकरच घटस्फोट घेणार आहे. उपासना सध्या द कपिल शर्मा शोमध्येही प्रेक्षकांना पाहायला मिळते. तिने अभिनेता नीरज भारद्वाजसोबत 2009मध्ये लग्न केले होते. नीरज साथ निभाना साथिया या मालिकेत काम करत आहे. उपासना आणि नीरजचे लग्नानंतर काही वर्षांतच खटके उडायला लागले. गेल्या चार वर्षांपासून ते दोघे वेगळेच राहात आहेत. त्यांनी त्यांच्या नात्याला अनेकवेळा वेळ देऊनही पाहिला तरीही काहीही सुधारणा होत नसल्याने आता त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून काहीच बोलणे नसल्याने आता या वर्षाच्या अखेरीस नीरज घटस्फोटासाठी अर्ज करणार आहे. दिवाळीनंतर लगेचच मी घटस्फोटासाठी अर्ज करणार अाहे असे नीरज सांगतो.