वडिलांना शेवटचं पाहिलं अन् ढसाढसा रडली; बापमाणूस गमावल्यावर दिशा वकानीची झाली अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:34 IST2026-04-09T13:32:36+5:302026-04-09T13:34:04+5:30

दयाबेन म्हणून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री दिशा वकानीला पितृशोक झाला. मंगळवारी(७ एप्रिल) तिचे वडील भीम वकानी यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून वडिलांना शेवटचा निरोप देताना दिशा वकानी आणि तिचा भाऊ मयूर वकानी भावुक झाले होते. 

disha wakani gets emotional at father bhim vakani last rites | वडिलांना शेवटचं पाहिलं अन् ढसाढसा रडली; बापमाणूस गमावल्यावर दिशा वकानीची झाली अशी अवस्था

वडिलांना शेवटचं पाहिलं अन् ढसाढसा रडली; बापमाणूस गमावल्यावर दिशा वकानीची झाली अशी अवस्था

दयाबेन म्हणून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री दिशा वकानीला पितृशोक झाला. मंगळवारी(७ एप्रिल) तिचे वडील भीम वकानी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने वकानी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. भीम वकानी काही काळापासून आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून वडिलांना शेवटचा निरोप देताना दिशा वकानी आणि तिचा भाऊ मयूर वकानी भावुक झाले होते. 

वडिलांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर दिशा वकानीला अश्रू अनावर झाले. आयुष्यातून बापमाणूस गेल्यानंतर अभिनेत्री ढसाढसा रडली. तर तिचा भाऊ आणि अभिनेता मयूर वकानीदेखील खचल्याचं दिसून आलं. वकानी कुटुंबीय आणि नातेवाईक दिशा आणि मयूरला धीर देत होते. या दु:खातून सावरण्याचा वकानी कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. 

विशेष म्हणजे, भीम वकानी हे केवळ दिशा वकानीचे वडील नव्हते, तर त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतही काही भागांमध्ये काम केले होते. मालिकेत त्यांनी चंपकलाल गडा (बापूजी) यांच्या मित्राची भूमिका साकारली होती. याशिवाय भीम वकानी हे गुजराती नाट्यसृष्टीतील एक दिग्गज कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. आपल्या दोन्ही मुलांनी, म्हणजेच दिशा आणि मयूरने अभिनय क्षेत्रात नाव कमवावे, यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले होते.

Web Title : दिशा वकानी के पिता का निधन, अंतिम संस्कार में अभिनेत्री हुई भावुक।

Web Summary : दयाबेन के नाम से मशहूर दिशा वकानी के पिता भीम वकानी का निधन हो गया। वो कुछ समय से बीमार थे। अंतिम संस्कार के दौरान दिशा और उनके भाई मयूर वकानी भावुक हो गए। भीम वकानी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में भी काम कर चुके थे।

Web Title : Disha Vakani mourns father's death; actress inconsolable at funeral.

Web Summary : Disha Vakani, famed as Dayaben, lost her father, Bhim Vakani. He was ailing for a while. Disha and her brother Mayur Vakani were emotional during the funeral. Bhim Vakani also acted in 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah'.