अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:06 IST2024-05-14T13:05:46+5:302024-05-14T13:06:12+5:30

७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये पुन्हा दिसणार दयाबेन! मालिकेतील अभिनेत्रीचा मोठा खुलासा

disha vakani replace by 28 years old actress as dayaben after 7 years in tarak mehta ka oolta chashmah confirms jeniffer mistry | अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री

अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेली मालिका आहे. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. तारक मेहता, जेठालाल, टप्पू, भिडे अंकल...या मालिकेतील सगळ्याच पात्रांवर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील दयाबेन ही भूमिकाही प्रचंड गाजली. अभिनेत्री दिशा वकानीला या भूमिकेने लोकप्रियता मिळवून दिली. पण, प्रेग्नन्सीमुळे दिशा वकानीने या मालिकेतून ब्रेक घेतला होता. तेव्हापासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत दयाबेन दिसली नव्हती. आता पुन्हा ७ वर्षांनी दयाबेनची मालिकेत एन्ट्री होणार आहे. 

दयाबेनला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये पाहण्यासाठी चाहते उस्तुक होते. गेल्या ७ वर्षांत अनेकदा दयाबेनच्या एन्ट्रीच्या चर्चाही रंगल्या. पण, मालिकेत दयाबेनची एन्ट्री काही झालीच नाही. मालिकेच्या मेकर्सने दयाबेनच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींच्या ऑडिशनही घेतल्या. पण, त्यांना हवी तशी अभिनेत्री मिळालीच नाही. त्यामुळे चाहत्यांनीही 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत दयाबेनला पुन्हा पाहण्याची आशा सोडून दिली होती. पण, आता मात्र मालिकेत पुन्हा दयाबेन दिसणरा आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री जेनिफर मेस्त्रीने याचा खुलासा केला आहे. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत लवकरच दयाबेनची एन्ट्री होणार असल्याचं जेनिफर मेस्त्रीने सांगितलं आहे. पण, मालिकेत दयाबेन म्हणून दिशा वकानी परतणार नाही. तर दुसरीच अभिनेत्री दिसणार आहे. गेल्या ३ वर्षांपासून दयाबेनच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्रीचं ऑडिशन होत असल्याचा खुलासा जेनिफरने केला आहे.   "दयाबेनच्या भूमिकेत दिसणारी मुलगी २८-२९ वर्षांची आहे. गेल्या ३ वर्षांपासून तिचं ऑडिशन सुरू आहे. तिला दिल्लीहून मुंबईला बोलवलं जातं. तिच्याबरोबर मॉकशूटही केलं जात आहे. ती वयाने लहान असल्याने जेठालाल आणि तिच्यातील वयाचं अंतर जास्त दिसू शकतं. ही चिंता मेकर्सला सतावत आहे," असं जेनिफरने सांगितलं. जेनिफरने त्या अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा केलेला नाही. पण, लवकरच 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेन दिसणार असल्याचं तिने म्हटलं आहे. 

दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीने प्रेग्नंन्सीमुळे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सोडली होती. ती पुन्हा मालिकेत परतणार असल्याचंही बोललं जात होतं. पण, याच्या केवळ चर्चाच होत राहिल्या. तिच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं.

Web Title: disha vakani replace by 28 years old actress as dayaben after 7 years in tarak mehta ka oolta chashmah confirms jeniffer mistry