दिग्दर्शिका व कोरियोग्राफर फराह खान दिसणार ह्या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 21:00 IST2018-12-05T21:00:00+5:302018-12-05T21:00:00+5:30

'कानपुर वाले खुराणाज्‌' हा शो लवकरच स्टार प्लसवर दाखल होणार आहे.

Director and choreographer Farah Khan will appear in this series | दिग्दर्शिका व कोरियोग्राफर फराह खान दिसणार ह्या मालिकेत

दिग्दर्शिका व कोरियोग्राफर फराह खान दिसणार ह्या मालिकेत

ठळक मुद्देफराह खान दिसणार विनोदी अंदाजात


स्टार प्लसवरील कानपुर वाले खुराणाज्‌मधील धम्माल आणि वेडेपणा आता एक नवीन उंची गाठणार आहे. कारण बॉलिवूडची लाडकी दिग्दर्शिका आणि कोरियोग्राफर फराह खान ह्या परिवारात सामिल होणार आहे. आपल्या विनोदबुद्धीसाठी मानली जाणारी फराह खान ह्या शोमध्ये प्रत्येक बाबतीत नाक खुपसणाऱ्या शेजारणीच्या रूपात दिसणार आहे.

फराह खान उत्साहाने म्हणाली, “या फॅमिली कॉमेडी शोचा हिस्सा बनताना मला खरेच खूप आनंद होत आहे. ह्या शोमधील माझी व्यक्तिरेखा दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसणारी शेजारीण असून ती अतिशय रोचक आहे. सुनिल ग्रोव्हर, अलि असगर आणि उपासना सिंग यांच्यासारख्या सर्वोत्तम कॉमेडी शोमेनसोबत काम करताना मला खूप छान वाटते आहे. हा शो प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करेल आणि त्यांना यातील संकल्पना आपलीशी वाटेल.”
 'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये कुणाल खेमू कॉमेडी शोमॅन सुनिल ग्रोव्हरसोबत दिसून येईल आणि प्रेक्षकांचे निश्चितपणे तुफान मनोरंजन होईल. अतिशय विनोदी अशा स्टार प्लसवरील 'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये कुणाल खेमू टेलिव्हिजनवर सूत्रसंचालकाच्या रूपात पदार्पण करणार आहे.  ह्या शोमध्ये प्रथम सेलेब्रिटी अतिथी म्हणून बॉलीवूडमधील महान अभिनेता धर्मेद्र आणि किंग ऑफ रॅप बादशाह उपस्थित राहणार आहे. त्याच्यासोबत ह्या शोमध्ये अलि असगर, उपासना सिंग आणि सुगंधा मिश्रासुद्धा दिसणार आहेत. 'कानपुर वाले खुराणाज्‌' हा शो लवकरच स्टार प्लसवर दाखल होणार आहे. फराह खानला कॉमेडी करताना छोट्या पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Director and choreographer Farah Khan will appear in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.