दीपिका कक्करवर झाली शस्त्रक्रिया, १४ तास ऑपरेशन; शोएब म्हणाला, "ICU मध्ये प्रचंड वेदनेत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 15:58 IST2025-06-04T15:57:42+5:302025-06-04T15:58:38+5:30
शोएब इब्राहिमने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले...

दीपिका कक्करवर झाली शस्त्रक्रिया, १४ तास ऑपरेशन; शोएब म्हणाला, "ICU मध्ये प्रचंड वेदनेत..."
'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दीपिका कक्कर (Deepika Kakar) कठीण काळातून जात आहे. आधी तिला लिव्हर ट्यूमरचं निदान झालं. तर नंतर लक्षात आलं की तिला लिव्हर कॅन्सरही झाला आहे जो शरिरात पसरला आहे. यानंतर दीपिका आणि पती शोएबच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना दीड वर्षाचा रुहान हा मुलगा आहे जो अजूनही आईवर अवलंबून आहे. दीपिकाला लेकाची जास्त काळजी होती. दरम्यान दीपिकावर शस्त्रक्रिया लगेच करता येणार नव्हती कारण तिला खूप ताप होता. अखेर आता तिच्यावर सर्जरी झाली असून शोएबने तिचे हेल्थ अपडेट दिले आहेत.
शोएब इब्राहिमने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले,"काल रात्री दीपिकावर शस्त्रक्रिया झाली. १४ तास ती ऑपरेशन रुममध्ये होती. देवाच्या कृपेने शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सध्या दीपिका आयसीयूमध्ये आहे आणि तिला प्रचंड वेदना होत आहे. पण ती स्थिर आहे. तुम्ही सगळ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली त्यासाठी मनापासून आभार. ती आयसीयूतून बाहेर आल्यावर मी पुढचे अपडेट देईनच. पुन्हा एकदा आभार."
काही दिवसांपासून शोएब इब्राहिम आपल्या व्लॉगमधून दीपिकाबद्दल हेल्थ अपडेट देत होता. सुरुवातीला ट्युमर आणि नंतर कॅन्सरचं निदान यामुळे दोघंही चिंतेत होते. आता शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने त्यांच्या चाहत्यांच्याही जीवात जीव आला आहे.
'या'सेलिब्रिटींचीही कॅन्सरशी झुंज
मनोरंजनविश्वात काही सेलिब्रिटी कॅन्सरशी लढा देत आहेत. हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. तर नुकताच टीव्ही अभिनेता विभू राघवचं कॅन्सरमुळे निधन झालं. काही दिवसांपूर्वीच आयुष्मान खुरानाच्या पत्नीलाही दुसऱ्यांदा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे.