लिव्हर कॅन्सरचं निदान झाल्यानंतर दीपिका कक्करवर सर्जरी, पती शोएबने शेअर केली पोस्ट, म्हणाला- "तिच्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:34 IST2025-06-03T11:34:01+5:302025-06-03T11:34:19+5:30

दीपिकाला लिव्हर ट्युमर असल्याचं समजलं होतं. त्यावर अभिनेत्री उपचार घेत होती. त्यादरम्यानच तिला कॅन्सरचं निदान झालं. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आता आज दीपिकावर सर्जरी करण्यात येणार आहे. 

Dipika Kakkar undergoes surgery after being diagnosed with liver cancer husband Shoaib shares post | लिव्हर कॅन्सरचं निदान झाल्यानंतर दीपिका कक्करवर सर्जरी, पती शोएबने शेअर केली पोस्ट, म्हणाला- "तिच्यासाठी..."

लिव्हर कॅन्सरचं निदान झाल्यानंतर दीपिका कक्करवर सर्जरी, पती शोएबने शेअर केली पोस्ट, म्हणाला- "तिच्यासाठी..."

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. त्याआधी दीपिकाला लिव्हर ट्युमर असल्याचं समजलं होतं. त्यावर अभिनेत्री उपचार घेत होती. त्यादरम्यानच तिला कॅन्सरचं निदान झालं. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आता आज दीपिकावर सर्जरी करण्यात येणार आहे. 

दीपिकाच्या सर्जरीबाबत पती शोएब इब्राहिमने सोशल मीडियावर पोस्ट करत अपडेट दिली आहे. "दीपिकाची सर्जरी उद्या सकाळी होणार आहे. ही सर्जरी खूप वेळ चालणार आहे. तिला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. तिच्यासाठी कृपया प्रार्थना करा", असं शोएबने पोस्टमध्ये म्हटलं आहे. काल त्याने ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली होती.  दीपिकाची लिव्हर ट्युमरची सर्जरी काही दिवसांपूर्वी होणार होती. मात्र त्यादरम्यानच अभिनेत्रीची तब्येत बिघडली. त्यामुळे सर्जरी पुढे ढकलण्यात आली होती. 

दीपिका आणि शोएब इब्राहिम हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहे. दीपिकाला कॅन्सरचं निदान झाल्याने शोएब आणि त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. दीपिका आणि रुहानला दीड वर्षाचा मुलगा आहे. या सगळ्यातून दीपिका बरी होण्यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत.

Web Title: Dipika Kakkar undergoes surgery after being diagnosed with liver cancer husband Shoaib shares post