लिव्हर कॅन्सरनंतर पोटात आढळली गाठ, सर्जरीनंतर आता कशी आहे दीपिका कक्कर? पती शोएब म्हणाला- "तिला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 10:59 IST2026-02-25T10:59:25+5:302026-02-25T10:59:52+5:30

दीपिकावर सर्जरी झाल्यानंतर शोएबने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या इन्स्टा स्टोरीतून त्याने हेल्थ अपडेट दिले आहेत.

dipika kakar goes under cyst surgery after liver cancer husband shoaib ibrahim gives health update | लिव्हर कॅन्सरनंतर पोटात आढळली गाठ, सर्जरीनंतर आता कशी आहे दीपिका कक्कर? पती शोएब म्हणाला- "तिला..."

लिव्हर कॅन्सरनंतर पोटात आढळली गाठ, सर्जरीनंतर आता कशी आहे दीपिका कक्कर? पती शोएब म्हणाला- "तिला..."

हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेली दीपिका कक्कर गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणांमुळे त्रस्त आहे. दीपिकाला २०२५मध्ये लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर सर्जरी करण्यात आली होती. दीपिकाची केमोथेरेपीही सुरू होती. मात्र त्यादरम्यानच पुन्हा तिच्या पोटात एक लहान गाठ(सिस्ट) आढळली. याबाबत तिने चाहत्यांना व्हिडीओतून माहिती दिली होती. त्यानंतर दीपिकाची सर्जरी करण्यात आली आहे. दीपिकाच्या हेल्थबाबत पती शोएब इब्राहिमने अपडेट दिली आहे. 

दीपिकावर सर्जरी झाल्यानंतर शोएबने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या इन्स्टा स्टोरीतून त्याने हेल्थ अपडेट दिले आहेत. "अल्लाहच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रार्थनांमुळे दीपिकाची सर्जरी व्यवस्थित पार पडली आहे. सगळं काही नीट झालं. दीपिकाही हळूहळू बरी होत आहे. पण, तिला थोडा त्रास होतो आहे. पण काळजी करण्यासारखं काहीच नाही. तुम्ही केलेल्या प्रार्थनांसाठी पुन्हा एकदा धन्यवाद", असं शोएबने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून दीपिकाला पोटात आणि खांद्याला तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे २१ फेब्रुवारी रोजी तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये १.३ सेंटीमीटरची एक छोटी गाठ दिसून आली. विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये झालेल्या पीईटी स्कॅनमध्ये ही गाठ नव्हती. त्यामुळे दोघेही काहीसे चिंतेत होते. मात्र, इतर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याने घाबरण्याचे कोणतेही मोठे कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दीपिकाची लिव्हर कॅन्सरची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर कॅन्सर पुन्हा उद्भवू नये म्हणून ती ओरल थेरेपी घेत होती. त्यादरम्यानच तिला त्रास जाणवू लागला होता. 

Web Title : दीपिका कक्कड़ की सिस्ट सर्जरी सफल; शोएब ने दिया हेल्थ अपडेट।

Web Summary : 2025 से कैंसर से जूझ रहीं दीपिका कक्कड़ की सिस्ट की सर्जरी हुई। पति शोएब इब्राहिम ने बताया कि सर्जरी सफल रही, और वह ठीक हो रही हैं, हालांकि कुछ तकलीफ है। हाल ही में स्कैन के बाद डॉक्टरों को सिस्ट मिली।

Web Title : Dipika Kakar's surgery successful after cyst found; Shoaib shares update.

Web Summary : Dipika Kakar, battling cancer since 2025, underwent surgery after a cyst was found. Husband Shoaib Ibrahim shared that the surgery was successful, and she is recovering, though experiencing some discomfort. Doctors discovered the cyst after recent scans.