Video - दीपिका कक्करने दिला जुळ्या मुलांना जन्म?; पती शोएब इब्राहिमने सांगितलं ‘सत्य’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 04:32 PM2023-06-09T16:32:32+5:302023-06-09T16:33:19+5:30

Dipika Kakar : लोकप्रिय कपल शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

dipika kakar given birth to twins husband shoaib ibrahim told what truth revealed delivery date | Video - दीपिका कक्करने दिला जुळ्या मुलांना जन्म?; पती शोएब इब्राहिमने सांगितलं ‘सत्य’

Video - दीपिका कक्करने दिला जुळ्या मुलांना जन्म?; पती शोएब इब्राहिमने सांगितलं ‘सत्य’

googlenewsNext

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कपल शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अभिनेत्री तिच्या गरोदरपणाचा शेवटचा महिना एन्जॉय करत आहे. त्याचवेळी, दीपिका जुळ्या मुलांची आई होणार असल्याच्या अफवाही पसरत आहेत. दीपिका आणि शोएबने आता या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे आणि अभिनेत्रीची डिलिव्हरीची तारीख कधी आहे हे देखील सांगितलं आहे.

आपल्या लेटेस्ट व्लॉगमध्ये शोएबने सांगितले की, दीपिकाच्या गरोदरपणाबद्दल खोट्या बातम्या आणि व्हिडीओ पसरवले जात असल्याचं त्याला आढळलं आहे. तो म्हणाला की, काही लोक दावा करतात की अभिनेत्रीने मुलाचे स्वागत केलं आहे, तर काही लोक म्हणतात की तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. शोएबने या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. 

शोएबने यासोबतच चाहत्यांना सांगितले की, त्याची पत्नी दीपिकाची डिलिव्हरी कधी होणार आहे. दीपिकाला जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यातील तारीख दिली असल्याचं त्याने व्लॉगमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, दीपिकाने चाहत्यांना तिच्या प्रसूतीबद्दलच्या कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं. ते म्हणाले की, मुलाबद्दल कोणतीही बातमी त्यांच्या अधिकृत हँडलवर शेअर केली जाईल.

यापूर्वी दीपिकाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्यावर खोट्या गर्भधारणेचा आरोप केला आहे. दीपिकाने सांगितले होते की, तिने उघडपणे आपला बेबी बंप दाखवला नाही, त्यानंतर लोकांनी तिने उशीचा वापर केल्याचं म्हटलं. या आरोपांमुळे संतापलेल्या अभिनेत्रीने सांगितले होतं की, तिला इतरांना दाखवण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: dipika kakar given birth to twins husband shoaib ibrahim told what truth revealed delivery date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.