कॅन्सरमुळे अभिनेत्रीचे गळत आहेत केस, वापरावा लागतोय हेअर पॅच, झाली अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:32 IST2025-10-28T14:31:33+5:302025-10-28T14:32:26+5:30
दीपिका कॅन्सरशी लढा देत असून त्यावर उपचार घेत आहे. त्यामुळे दीपिका इंडस्ट्रीपासूनही दूर आहे. दीपिकाने व्लॉगमधून तिचे हेल्थ अपडेट्स चाहत्यांना देत असते.

कॅन्सरमुळे अभिनेत्रीचे गळत आहेत केस, वापरावा लागतोय हेअर पॅच, झाली अशी अवस्था
'ससुराल सिमर का' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करला काही महिन्यांपूर्वीच स्टेज २ लिव्हर कॅन्सरचं निदान झालं. तेव्हापासून दीपिका कॅन्सरशी लढा देत असून त्यावर उपचार घेत आहे. त्यामुळे दीपिका इंडस्ट्रीपासूनही दूर आहे. दीपिकाने व्लॉगमधून तिचे हेल्थ अपडेट्स चाहत्यांना देत असते. कॅन्सरच्या कीमोथेरेपीमुळे दीपिकाच्या आरोग्यावर परिणाम होत असून तिचे केसही प्रचंड गळत आहेत.
केसगळतीमुळे आता दीपिकाला हेअर पॅच वापरावा लागत आहे. दीपिकाने तिच्यासाठी खास हेअर पॅच बनवून घेतला आहे. याबाबत तिने तिच्या नव्या व्लॉगमधून चाहत्यांना माहिती दिली आहे. दीपिकाने व्ही शेप हेअर पॅच ऑर्डर केल्याचं व्हिडीओतून सांगितलं. याशिवाय हा हेअर पॅच कसा वापरायचा हेदेखील दीपिकाने तिच्या व्हिडीओत दाखवलं आहे. शूटिंगसाठीही असे हेअर पॅच किंवा विग वापरत असल्याचा खुलासा दीपिकाने व्हिडीओत केला आहे.
दीपिकाचे व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना अभिनेत्रीच्या हेल्थबाबत चिंता सतावत आहे. ती लवकर बरं होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. दीपिकाला मे महिन्यात लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. पोटात दुखत असल्याने रुग्णालयात गेल्यातनंतर कॅन्सर असल्याचं तिला समजलं. त्यानंतर जून महिन्यात दीपिकाची सर्जरी करण्यात आली. १४ तास ही सर्जरी सुरू होती. आता ती कॅन्सरवर उपचार घेत आहे.