​‘ससुराल सिमर का’मध्ये आता डायन ट्रॅक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 15:53 IST2016-06-14T10:23:16+5:302016-06-14T15:53:56+5:30

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील मख्खी ट्रॅक आता संपलाय. कारण लवकरच या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.. लवकरच या ...

Dion track now in 'Sasural Simar Ka' | ​‘ससुराल सिमर का’मध्ये आता डायन ट्रॅक...

​‘ससुराल सिमर का’मध्ये आता डायन ट्रॅक...

सुराल सिमर का’ या मालिकेतील मख्खी ट्रॅक आता संपलाय. कारण लवकरच या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.. लवकरच या मालिकेत डायनचं कमबॅक होणार आहे. आगामी भागात प्रेमा (मानसी श्रीवास्तव) आणि माताजी (जयती भाटिया) या चंद्रमणीचा (विंध्या तिवारी) बदला घेतील. सोबतच सिमर मख्खीच्या रुपातून आपल्या मूळ अवतारात समोर येईल.. प्रेमा आणि माताजी, या चंद्रमणीला आरशात पाहायला सांगतील. त्यामुळं चंद्रमणी एक मणिमध्ये रुपांतरीत होईल.. सिमर उडून त्या मणिवर बसेल आणि मूळ रुपात बदलेल.. प्रेमा, माताजी आणि सिमर एक खड्डा खोदून मणि त्यात टाकतील ज्यामुळं मणि पाताळात जाईल.. यासोबत या मालिकेत नवा डायन ट्रॅक सुरु होईल.. चंद्रमणि मणि रुपात बदला घेऊ शकणार नाही, त्यामुळं डायनची मदत घेण्यात येईल.. सोबतच वैष्णवी धनराजची योग शिक्षिकेच्या रुपात एंट्री होईल.  


Web Title: Dion track now in 'Sasural Simar Ka'