दिल तो पागल है या चित्रपटातील ​बलविंदर सिंग झळकणार खिचडी या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:33 IST2017-11-09T12:03:00+5:302017-11-09T17:33:00+5:30

खिचडी या मालिकेतील हॅलो हाऊ आर खाना खाके जाना हा... हा सुप्रिया पाठकचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे ...

Dilwheer Pagal Hai, Balwinder Singh Chhangki Khichdi in the film | दिल तो पागल है या चित्रपटातील ​बलविंदर सिंग झळकणार खिचडी या मालिकेत

दिल तो पागल है या चित्रपटातील ​बलविंदर सिंग झळकणार खिचडी या मालिकेत

चडी या मालिकेतील हॅलो हाऊ आर खाना खाके जाना हा... हा सुप्रिया पाठकचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे हंसाला इंग्रजी भाषेचा हिंदीत अर्थ समजावणे हे प्रेक्षकांना चांगलेच रुचले होते. खिचडी ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील हंसा, प्रफुल्ल, जयश्री, बाऊजी, राजू, मेलिसा, चक्की, जॅकी, भावेश कुमार या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. खिचडी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेवर खिचडी नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता ही मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 
खिचडी ही मालिका २००२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेने जवळजवळ दोन वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही मालिका संपल्यानंतर २००५ मध्ये याच मालिकेची संपूर्ण टीम घेऊन निर्माते जे.डी.मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी इन्स्टंट खिचडी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली होती. आता या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाला गेल्या शुक्रवारपासून सुरुवात देखील झाली आहे. बाबूजींच्या भूमिकेत असलेले अनंत देसाई, प्रफुल्लच्या भूमिकेत असलेला राजीव मेहता, हंसाच्या भूमिकेत असलेली सुप्रिया पाठक आणि जयश्रीच्या भूमिकेत असलेले वंदना पाठक या सिझनमध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. आतिश कपाडिया गेल्या कित्येक दिवसांपासून या मालिकेच्या पटकथेवर काम करत आहेत. 
खिचडी या मालिकेत प्रेक्षकांना काही नव्या व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत. खिचडी या मालिकेत बलविंदर सिंगची एंट्री होणार असून बलविंदर या मालिकेत परमिंदर कुटुंबातील दाखवला जाणार आहे. बलविंदरने कॅम्पस या मालिकेत काम केले होते. तसेच दिल तो पागल है या चित्रपटात तो झळकला होता. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे निर्माते आतिश कपाडियाचा मुलगा अगस्त्या आणि जेडी मजेठीयाची मुलगी मिश्री या मालिकेत जॅकी आणि चक्की या भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 

Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मामधील दया म्हणजेच दिशा वाकानीच्या ओटीभरणाला उपस्थिती लावली तिच्या ऑनस्क्रीन मुलाने

Web Title: Dilwheer Pagal Hai, Balwinder Singh Chhangki Khichdi in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.