​दिल ही तो है या मालिकेद्वारे बॉलिवूडमधील हा अभिनेता करणार छोट्या पडद्यावर आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 14:41 IST2018-05-08T09:11:24+5:302018-05-08T14:41:24+5:30

मासूम या चित्रपटापासून प्यार का पंचनामा पर्यंत बर्‍याच चित्रपटात आपल्याला ओंकार कपूरला पाहायला मिळाले आहे. त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे ...

Dil Chahta Hai, this series of Bollywood stars will arrive on the small screen | ​दिल ही तो है या मालिकेद्वारे बॉलिवूडमधील हा अभिनेता करणार छोट्या पडद्यावर आगमन

​दिल ही तो है या मालिकेद्वारे बॉलिवूडमधील हा अभिनेता करणार छोट्या पडद्यावर आगमन

सूम या चित्रपटापासून प्यार का पंचनामा पर्यंत बर्‍याच चित्रपटात आपल्याला ओंकार कपूरला पाहायला मिळाले आहे. त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. आता हा बॉलिवूडचा कलाकार सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘दिल ही तो है’ मालिकेद्वारे टेलीव्हिजनवर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. ‘दिल ही तो है’ ही एकता कपूर बॅनरच्या अंतर्गत तयार होत असलेली एक प्रेम कथा आहे. ओंकार या मालिकेत ऋत्विक ही मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. 
ओंकार कपूरने आपली कारकीर्द मासूम या चित्रपटापासून सुरू केली होती. या चित्रपटात तो बाल कलाकार असला तरी त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. तो त्या काळातील सर्वांचा लाडका बाल कलाकार बनला होता. आता तो तरुणीच्या हृदयाचा ठोका चुकवायला टेलिव्हिजनवर येत आहे. त्याने आजवर भारतीय चित्रपट उद्योगातील अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. आता तो छोट्या पडद्याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. याविषयी ओंकार सांगतो, “सोनी आणि एकता मॅडमच्या माध्यमातून मला टेलीव्हिजन उद्योगात सामील होण्याची संधी मिळत आहे हे मी माझे भाग्य मानतो. यामुळे प्रेक्षकांपुढे उत्तम अभिनय सादर करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे.”
‘दिल ही तो है’ मालिकेतून पदार्पण करत असल्याबद्दल तो सांगतो, “या मालिकेत प्रेक्षकांना एक आगळी वेगळी प्रेम-कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मी ऋत्विक ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत असून तो महत्त्वाकांक्षी आणि कामाच्या बाबतीत धडाडीचा आहे तर दुसरीकडे तो एक अत्यंत आकर्षक तरुण आहे. ज्याचे स्वप्न प्रत्येक तरुणी पाहते. पण शेवटी ते एक दुःस्वप्न ठरते. ‘छोटा बच्चा जान के’ पासून ते पडद्यावर रोमान्स करण्यापर्यंतचा माझा प्रवास सुंदर होता आणि टेलिव्हिजनच्या पडद्यावर मला माझा ठसा उमटवायचा आहे. कारण या माध्यमाचा प्रेक्षकवर्ग खूप व्यापक आहे. प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम अभिनय सादर करण्यास मी उत्सुक आहे”.

omkar kapoor


Also Read : ‘दिल ही तो है’ मध्ये फरीदा दादी साकारणार कभी खुशी कभी गम या चित्रपटातील या पात्राशी सार्धम्य असलेली व्यक्तिरेखा

Web Title: Dil Chahta Hai, this series of Bollywood stars will arrive on the small screen