'दिल बोले ओबेरॉय'मध्ये राहुल देवच्या पत्नीची भूमिका साकारणार निधी उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 14:28 IST2017-02-10T08:58:14+5:302017-02-10T14:28:14+5:30

'बिग बॉस' या शोनंतर राहुल देव आता दिल बोले ओबेरॉय मालिकेत या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ये ...

'Dil Bole Oberoi' plays the role of Rahul Dev's wife in funding better | 'दिल बोले ओबेरॉय'मध्ये राहुल देवच्या पत्नीची भूमिका साकारणार निधी उत्तम

'दिल बोले ओबेरॉय'मध्ये राहुल देवच्या पत्नीची भूमिका साकारणार निधी उत्तम

'
;बिग बॉस' या शोनंतर राहुल देव आता दिल बोले ओबेरॉय मालिकेत या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतील नंदिनी दिदी या भूमिकेत झळकलेली निधी उत्तम राहुल देवच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहेत. राहुल देव या मालिकेत काली प्रताप ठाकुरची भूमिका साकराताना दिसणार आहे. तर निधी जानवी नावाच्या ठकुराईनच्या भूमिकेत झळकणार आहे.

याविषयी निधीने सांगितले की, गेल्या 8 वर्षापासून ये रिश्ता क्या कहलाता है या लोकप्रिय मालिकेत नंदिनी ही भूमिका साकारली.या भूमिकेने मला एक नविन ओळखच मिळवून दिली नाहीतर माझ्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली आहे. आता नंदिनी म्हणूनच चाहते मला ओळखतात. मात्र कोणतेही कॅरेक्टरमुळे न ओळखता एक अभिनेत्री म्हणून नावारूपाला यायचे आहे. त्यासाठी दिल बोले ओबेरॉय या मालिकेतील ही भूमिका मी स्विकारली. नवी गोष्टी करताना खूप सा-या नविन गोष्टी शिकायला मिळतात. शिवाय मालिकेतील माझ्या लूकही ठकुराईन भूमिकेसाठी परफेक्ट असल्यामुळे रसिकही नव्या अंदाजात मला पाहतील. या भूमिकेवर थोडा बंगली प्रभाव असल्यामुळे माझा मेकओव्हरही खूप शाही करण्यात आला आहे.या भूमिकेतील माझा लूक मला देवदास सिनेमातील ऐश्वर्याची आठवण करून देतो. 
 
शिवाय मी राहुल देव या प्रसिध्द कलाकरांसह झळकणार असल्याने वेगळा आनंद आहे.त्यांच्याकडून खूप नविन गोष्टी शिकायला मिळतात, त्यांच्या बरोबर काम करायला मिळणे भाग्याचे समजते.'दिल बोले ओबरॉय' ही मालिका इश्कबाज या मालिकेची विस्तारित मालिका असून 'इश्कबाज' मालिकेच्या रोजच्या वेळेनुसारच ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.या मालिकेत शिवाय, ओंकार आणि रूद्र या ओबेरॉय बंधूंच्या जीवनावर अधिक जवळून वेध घेतला जाणार आहे. प्रेम आणि चांगुलपणावरील त्याचा विश्वास पार नष्ट झाला आहे. या बंधूंच्या जीवनातील नाट्य़ आता ‘डीबीओ’मधून उलगडले जाणार आहे.'दिल बोले ओबेरॉय' ही मालिका मालिका 13 फेब्रुवारीपासून प्रसारित केली जाणार आहे.

Web Title: 'Dil Bole Oberoi' plays the role of Rahul Dev's wife in funding better

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.