दिया और बाती हम फेम अनस रशिदच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 11:44 IST2017-09-11T06:14:15+5:302017-09-11T11:44:15+5:30
दिया और बाती हम या मालिकेत अनस रशिदने सुरज राठीची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर ...

दिया और बाती हम फेम अनस रशिदच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?
द या और बाती हम या मालिकेत अनस रशिदने सुरज राठीची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या मालिकेमुळे सुरजच्या फिमेल फॅन फॉलॉव्हिंगमध्ये तर खूप वाढ झाली. पण सुरजने त्याच्या चाहत्यांचे हृदय तोडत हिना इकबालसोबत लग्न केले आहे. मुस्लिम पद्धतीने अनिसने पंजाबमधील मलेरकोटा येथे नुकतेच लग्न केले. लग्नात अनस खूपच छान दिसत होता. त्यानेच त्याच्या लग्नाचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटला पोस्ट केले आहेत. त्याच्या या फोटोंना खूप सारे लाइक्स मिळत आहेत. तसेच अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
![Anas Rashid]()
'दिया और बाती' फेम अनस रशिदचा हिनासोबत साखरपुडा एप्रिल महिन्यात झाला होता. हिना ही मुळची चंदीगढ येथे राहणारी असून ती अनस पेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. अनसच्या आईने हिना आणि अनस यांची भेट घडवून आणली होती. पहिल्याच भेटीत अनसला हिना आवडली आणि त्याने लगेचच लग्नासाठी होकार दिला होता. हिना ही अनसच्या क्षेत्रातील नसून ती कॉर्पोरेट जगतातील आहे. चंडिगडमधील एका कंपनीत ती एचआर डिपार्टमेंटमध्ये काम करते. अनसने सध्या त्याच्या कामातून ब्रेक घेतला असून तो काही दिवस पंजाबमध्ये कुटुंबियांसह निवांत वेळ घालवतोय. 'दिया और बाती' मालिकेतील अनसने साकारलेली भूमिका अनसच्या सासरच्या मंडळींनाही खूप आवडली होती. त्यामुळे जसे हिनासाठी अनसचे स्थळ आले त्यावेळी विचार करण्याचा प्रश्न नव्हताच अशा प्रतिक्रिया त्याच्या सारच्या मंडळींनी दिल्या आहेत.
Also Read : दिया और बाती हम फेम दीपिका सिंगने दिला गोंडस मुलाला जन्म