​दिव्यांका त्रिपाठीचे हम्मा...हम्मा या गाण्यावरील नृत्य तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 13:46 IST2017-02-17T08:16:09+5:302017-02-17T13:46:09+5:30

ओके जानू या चित्रपटातील हम्मा... हम्मा हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्यात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय ...

Did you see a dance on the song Hmmma ... Hmmma from Tripani? | ​दिव्यांका त्रिपाठीचे हम्मा...हम्मा या गाण्यावरील नृत्य तुम्ही पाहिले का?

​दिव्यांका त्रिपाठीचे हम्मा...हम्मा या गाण्यावरील नृत्य तुम्ही पाहिले का?

े जानू या चित्रपटातील हम्मा... हम्मा हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्यात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर नृत्य तर प्रेक्षकांना खूप आवडले होते. या गाण्यात श्रद्धा खूपच बोल्ड अवतारात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता प्रेक्षकांना ये है मोहोब्बते फेम दिव्यांका त्रिपाठी या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.
दिव्यांका कोणत्या मालिकेत अथवा पुरस्कार सोहळ्यात या गाण्यावर थिरकणार नाहीये तर तिने तिच्या गाडीत हा डान्स केला आहे आणि याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगला पोस्ट केला आहे. दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया सध्या फिरायला गोव्याला गेले आहेत. व्हेलेंटाईन डेच्या निमित्ताने विवेकने तिला एक छान सरप्राइज दिले आहे. तो तिला घेऊन दोन दिवसांसाठी गोव्याला गेला आहे. खरे तर त्याला खूप दिवसांसाठी तिला व्हेकेशनवर घेऊन जायचे होते. पण चित्रीकरणात ते दोघे व्यग्र असल्याने त्या दोघांना खूप दिवसांसाठी जाता आले नाही. पण त्यांचे हे दोन दिवस दिव्यांका आणि विवेक खूप चांगल्याप्रकारे एन्जॉय करत आहेत. त्यांनी त्यांच्या व्हेकेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. दिव्यांकाला विवेकने खूप साऱ्या गुलाबांचा गुच्छ दिसल्याचे आपल्याला एक फोटोतून दिसत आहे. तर काही बीचवरील फोटो त्यांनी पोस्ट केले आहेत. या सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दिव्यांकाचा व्हिडिओ. गोव्याला गाडीतून फिरत असताना तिने हम्मा हम्मा या गाण्यावर गाडीतच ताल धरला आहे. हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून याला अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. 
 

Web Title: Did you see a dance on the song Hmmma ... Hmmma from Tripani?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.