दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाची नच बलियेमधील केमिस्ट्री तुम्ही पाहिली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 11:43 IST2017-04-03T06:13:33+5:302017-04-03T11:43:33+5:30

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी 8 जुलै 2016ला केले. त्या दोघांची भेट ये है मोहोब्बते या मालिकेच्या सेटवरच ...

Did you see the chemistry of Balika Balikaar and Diwali Tripathi Vivek Dahiya? | दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाची नच बलियेमधील केमिस्ट्री तुम्ही पाहिली का?

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाची नच बलियेमधील केमिस्ट्री तुम्ही पाहिली का?

व्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी 8 जुलै 2016ला केले. त्या दोघांची भेट ये है मोहोब्बते या मालिकेच्या सेटवरच झाली होती. ते दोघेही या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होते. चित्रीकरणाच्यावेळी या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दिव्यांका आणि विवेक यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. हे दोघे सध्या प्रेक्षकांना नच बलिये या कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. ये है मोहोब्बते या मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून ते सध्या नच बलियेचे चित्रीकरण करत आहेत. आपला परफॉर्मन्स चांगला व्हावा यासाठी ते अनेक तास मेहनत घेत आहेत. या दोघांनी या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात दिलवाले या चित्रपटातील गेरुआ या गाण्यावर नृत्य सादर केले. या पहिल्याच परफॉर्मन्सला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. परीक्षकांनीदेखील या दोघांच्या नृत्याचे चांगलेच कौतुक केले. या कार्यक्रमात सोनाक्षी सिन्हा परीक्षकाची भूमिका साकारत आहे. ती तर दिव्यांका आणि विवेकच्या परफॉर्मन्सवर फिदा झाली होती. तिने त्या दोघांच्या नृत्याची प्रशंसा केली. ती त्यांचे कौतुक करताना म्हणाली, "विवेक आणि दिव्यांका तुम्ही दोघे खूपच चांगले डान्सर तर आहात. पण त्याचसोबत तुम्ही दोघेही खूप चांगले अभिनेते आहात. माझी आई तर दिव्यांकाची खूप मोठी फॅन आहे. ये है मोहोब्बतेमध्ये इशिता म्हणजेच दिव्यांकाचे मूड ज्याप्रकारे बदलतात, त्याचप्रकारे माझ्या आईचे मूड बदलत असतात." 
सोनाक्षी नच बलिये या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत असली तरी ती नुकतीच दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमात झळकली होती. तिने नूर या तिच्या आगामी चित्रपटाचे तिथे प्रमोशन केले. 



Web Title: Did you see the chemistry of Balika Balikaar and Diwali Tripathi Vivek Dahiya?