'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? दिसायला आहे तिच्यासारखीच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 07:00 IST2022-09-18T07:00:00+5:302022-09-18T07:00:02+5:30

सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात.

Did you see 'Chala Hawa Yeu Dya' fame Shreya Bugde's sister ? Looks as beautiful as her | 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? दिसायला आहे तिच्यासारखीच सुंदर

'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? दिसायला आहे तिच्यासारखीच सुंदर

सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात. ते कुठे रहातात, त्यांच्याकडे कोणती गाडी आहे, कुटुंबात कोणकोण लोक आहेत. आज आम्ही तुम्हाला मराठी सिनेइंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री श्रेया बुगडेच्या बहिणी विषयी सांगणार आहोत..

छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. 

श्रेया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेकवेळेला श्रेया बहिणीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. श्रेया बुगडेची मोठ्या बहिणचं नाव तेजल असून ती दिसायला तिच्या इतकीच सुंदर आहे.

श्रेया आणि तेजलची चेहरेपट्टी अगदी सारखी असून त्यांच्या केवळ उंचीत फरक असल्याचे दिसून येते. श्रेया बहीण तेजलसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. या फोटोंमधून दोघींमधले बॉन्डिंग ही दिसून येते. 

Web Title: Did you see 'Chala Hawa Yeu Dya' fame Shreya Bugde's sister ? Looks as beautiful as her